Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sensitive Skin Care: सेंसिटिव्ह स्किन आहे? मग ‘हे’ व्हायरल ब्युटी हॅक्स वापरण्याआधी थांबा; त्वचेचे होईल नुकसान

Beauty Hacks To avoid For Sensitive Skin: सेंसिटिव्ह स्कीनची नियमित काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे चेहऱ्यावर कोणत्या गोष्टी लावताना अधिक काळजी घ्यावी, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 12, 2026 | 09:03 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • ग्लोइंग स्किनच्या नादात चेहऱ्याचं नुकसान नको
  • सेंसिटिव्ह स्किन असल्यास ब्युटी हॅक्स टाळा
  • सेंसिटिव्ह स्किनला होऊ शकतो त्रास
Sensitive Skin Care: आजकाल, सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी सोशल मीडियावर अनेक ब्युटी हॅक्स व्हायरल होत आहेत. काही जण चेहऱ्यावर लिंबू लावण्याचा सल्ला देतात, तर काही जण घरगुती स्क्रब आणि विविध फेस पॅक त्वचेसाठी फायदेशीर असल्याचे सांगतात. पण जर तुमची त्वचा सेंसिटिव्ह असेल आणि तुम्ही हे ब्युटी हॅक्स ट्राय केले तर तुम्हाला त्वचेशी संबधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नवीन प्रोडक्टमुळे किंवा काही विशिष्ट घटकांमुळे सेंसिटिव्ह स्कीनवर लालसरपणा, खाज, जळजळ आणि कोरडेपणा येऊ शकतो. त्यामुळे, चेहऱ्यावर काहीही लावण्यापूर्वी त्याचे संभाव्य परिणाम समजून घेणे महत्त्वाचे आहे. सेंसिटिव्ह स्कीन असेल तर कोणत्या गोष्टी चेहऱ्यावर लावू नयेत, जाणून घेऊयात. (Beauty Hacks To avoid For Sensitive Skin)

Health Tips: डायबिटीज-बीपीचा त्रास आहे? नवरात्रीचा उपवास करताना रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?

लिंबू थेट चेहऱ्यावर लावणे टाळा

लिंबाचा रस आम्लधर्मी असतो आणि त्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यास, त्यामुळे त्वचेवर गंभीर प्रतिक्रिया आणि व्रण देखील होऊ शकतात. चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी माइल्ड म्हणजेच सौम्य क्लीन्झर वापरा.

बेकिंग सोड्याने चेहरा घासणे टाळा

बेकिंग सोडा त्वचेचा नैसर्गिक PH बॅलन्स बिघडवू शकतो. यामुळे कोरडेपणा, जळजळ आणि स्कीन बॅरियर म्हणजेच संरक्षक थराला नुकसान होऊ शकते. यामुळे त्याचा घरगुती फेस स्क्रब म्हणून वापर टाळा.

वारंवार एक्सफोलिएट करू नका

डेड स्कीन काढण्यासाठी वारंवार स्क्रब करण्याची आवश्यकता नाही. जास्त प्रमाणात स्क्रब आणि एक्सफोलिएटिंग प्रोडक्ट्समुळे सेंसिटिव्ह त्वचेची जळजळ वाढू शकते. त्यामुळे, तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार एक्सफोलिएट करा.

नवीन स्किनकेअर प्रोडक्टसची पॅच टेस्ट करा

नवीन प्रोडक्टस संपूर्ण चेहऱ्यावर लावण्यापूर्वी, सर्वात आधी त्वचेच्या लहान भागावर पॅच टेस्ट करा. काही दिवस रिअॅक्शनचे निरीक्षण करा. परंतु, पॅच टेस्टद्वारे प्रत्येक ऍलर्जीची प्रतिक्रिया लक्षात येईलच असे नाही. त्यामुळे जर तुम्हाला स्कीन अॅलर्जी असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

प्रत्येक व्हायरल फेस पॅक वापरू नका

सोशल मीडियावर व्हायरल असण्याचा अर्थ असा नाही की एखादा फेस पॅक सर्व प्रकारच्या स्कीनसाठी सुरक्षित आहे. सुगंध, सेंटेंड ऑइल आणि काही नैसर्गिक घटकांमुळे देखील ॲलर्जी किंवा जळजळ होऊ शकते.

सेंसिटिव्ह स्कीनची काळजी कशी घ्यावी?

सेंसिटिव्ह स्कीनसाठी तुमची स्किनकेअर रुटीन जितकी सोपी असेल, तितकेच नवीन प्रोडक्टसमुळे होणाऱ्या जळजळीची कारणे ओळखणे सोपे जाईल. तुमचा चेहरा नेहमी सौम्य क्लीन्झरने किंवा फेस वॉशने स्वच्छ करा. तुमच्या स्कीन टाइप प्रमाणे मॉइश्चरायइजर लावा. तसेच, नियमितपणे सनस्क्रीन वापरा. ​​महत्वाची गोष्ट म्हणजे, एकाच वेळी खूप जास्त नवीन प्रोडक्ट्स वापरणे टाळा.

Sore Throat Remedies: सर्दी-खोकल्याने घसा दुखतोय, बोलणंही कठीण झालंय? घरच्या घरी करा ‘हे’ सोपे उपाय

Web Title: Sensitive skin care social media viral beauty hacks to avoid for skin pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 09:01 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • Skin Care
  • skin care tips
  • skin problem

संबंधित बातम्या

Skin Care Tips: पिंपल्सने भरलेला चेहरा आठवडाभरात होईल स्वच्छ! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ हिरव्या पावडरचा करा वापर
1

Skin Care Tips: पिंपल्सने भरलेला चेहरा आठवडाभरात होईल स्वच्छ! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ हिरव्या पावडरचा करा वापर

Navratri 2026: नवरात्रीत लुक दिसेल हटके! पहा पारंपरिक आणि मॉडर्न ऑक्सिडाईज कानातल्यांच्या सुंदर डिझाइन्स
2

Navratri 2026: नवरात्रीत लुक दिसेल हटके! पहा पारंपरिक आणि मॉडर्न ऑक्सिडाईज कानातल्यांच्या सुंदर डिझाइन्स

Navratri 2026: गरबा खेळताना चेहऱ्यावरचा मेकअप अजिबात पडणार नाही काळा! फॉलो करा ‘या’ सोप्या ब्युटी टिप्स, त्वचा दिसेल फ्रेश
3

Navratri 2026: गरबा खेळताना चेहऱ्यावरचा मेकअप अजिबात पडणार नाही काळा! फॉलो करा ‘या’ सोप्या ब्युटी टिप्स, त्वचा दिसेल फ्रेश

Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी ‘या’ पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर
4

Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी ‘या’ पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.