Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हामुळे टॅन झालेल्या त्वचेवर ‘या’ पद्धतीने करा Rice Facial, चेहऱ्यावर येईल मोत्यासारखा चमकदार ग्लो

चेहऱ्यावरील हरवलेली चमक पुन्हा मिळवण्यासाठी घरच्या घरी राईस फेशिअल करावे. यामुळे त्वचेवर चमकदार ग्लो येतो आणि उन्हामुळे वाढलेले टॅनिंग कमी होण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 05, 2026 | 09:54 AM
उन्हामुळे टॅन झालेल्या त्वचेवर 'या' पद्धतीने करा Rice Facial, चेहऱ्यावर येईल मोत्यासारखा चमकदार ग्लो

उन्हामुळे टॅन झालेल्या त्वचेवर 'या' पद्धतीने करा Rice Facial, चेहऱ्यावर येईल मोत्यासारखा चमकदार ग्लो

Follow Us
Close
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात तापमानात मोठी वाढ झाली आहे. कडक उन्हात कुठेही बाहेर गेल्यानंतर त्वचा रंग काळवंडून जातो आणि त्वचा निस्तेज होते. चेहऱ्यावर टॅनिंग वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेले महागडे फेशिअल करून घेतात तर कधी पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रीटमेंट केल्या जातात. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी सतत काहींना काही केले जाते. पण चुकीचे स्किन किंवा क्रीमचा वापर केल्यामुळे चेहऱ्याला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. दुपारच्या वेळी कुठेही बाहेर गेल्यानंतर कडक उन्हामुळे त्वचा टॅन होऊन काळी होऊन जाते. धूळ, प्रदुषण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कुठेही बाहेर गेल्यानंतर तोंडाला स्कर्फ बांधूनच बाहेर पडावे. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी घरच्या घरी राईस फेशिअल करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

Skin Care Tips: कच्च्या दुधाने ५ मिनिटं नियमित चेहऱ्यावर करा मसाज, आठवडाभर त्वचेवर येईल चमकदार ग्लो

ग्लोईंग त्वचेसाठी राईस फेशियल करण्याची सोपी पद्धत:

चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी राईस फेशिअल करावे. यासाठी वाटीमध्ये दोन ते तीन चमचे तांदळाचे पाणी घेऊन त्यात कच्चे दूध घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर कापसाचा गोळा त्यात बुडवून संपूर्ण चेहऱ्यावर तयार केलेले मिश्रण लावा आणि काही वेळानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली धूळ, माती आणि घाण स्वच्छ होण्यास मदत होईल.

चेहरा स्वच्छ करून झाल्यानंतर स्क्रब लावावे. यासाठी तांदळाच्या पिठात कॉफी पावडर आणि गुलाब पाणी मिक्स करून संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्या. तयार केलेला लेप संपूर्ण चेहऱ्यावर लावून नंतर हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे त्वचेवर जमा झालेली डेड स्किन आणि घाण निघून जाण्यास मदत होईल. स्क्रब केल्यामुळे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, डेड स्किन नष्ट होण्यास मदत होते. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून टाका.

वाटीमध्ये तांदळाचे पाणी, बीटरुटचा रस आणि कोरफड जेल एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे त्वचेमधील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. यामुळे चेहऱ्याला पोषण सुद्धा मिळेल. चेहऱ्यावर वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी आणि त्वचा मऊ, मुलायम करण्यासाठी बीटच्या रसाचा वापर करावा.

उन्हामुळे काळवंडलेली त्वचा होईल आठवडाभरात गोरीपान! बटाट्याच्या रसात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, चेहरा राहील कायमच फ्रेश

मास्क तयार करण्यासाठी सर्वप्रथम, शिजवलेला भात मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. वाटून झाल्यानंतर तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढा त्यात मध घालून मिश्रण तयार करा. तयार केलेल्या मिश्रण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा आणि नंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. राईस फेशिअल केल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Do rice facial in this way on sun tanned skin the face will have a pearly glow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 09:54 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • Skin Care
  • summer care tips

संबंधित बातम्या

शरीरात वाढलेली उष्णता आणि डोकेदुखीच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, राहाल कायमच फ्रेश
1

शरीरात वाढलेली उष्णता आणि डोकेदुखीच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, राहाल कायमच फ्रेश

उन्हाळ्यात चेहरा किती वेळा स्वच्छ करावा? सतत चेहरा धुतल्यास त्वचेचे होईल गंभीर नुकसान, जाणून घ्या सविस्तर
2

उन्हाळ्यात चेहरा किती वेळा स्वच्छ करावा? सतत चेहरा धुतल्यास त्वचेचे होईल गंभीर नुकसान, जाणून घ्या सविस्तर

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल
3

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.