Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कच्चे बीट खाल्ल्यानंतर पचन होत नाही? मग झटपट बनवा बीटरूट सॅलड, अशक्तपणा- रक्ताची कमतरता निघेल भरून

कच्चे बीट खाल्ल्यानंतर अनेकांना पचनाच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे शिजवलेल्या बीटपासून तुम्ही सॅलड बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 13, 2026 | 08:00 AM
कच्चे बीट खाल्ल्यानंतर पचन होत नाही? मग झटपट बनवा बीटरूट सॅलड, अशक्तपणा- रक्ताची कमतरता निघेल भरून

कच्चे बीट खाल्ल्यानंतर पचन होत नाही? मग झटपट बनवा बीटरूट सॅलड, अशक्तपणा- रक्ताची कमतरता निघेल भरून

Follow Us
Follow Us:

दैनंदिन आहारात डॉक्टरांसह घरातील वयस्कर व्यक्ती वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला देतात. आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. त्यामुळे कायमच तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेले हेल्दी आणि शरीरास आवश्यक पोषण देणारे पदार्थ खावेत. बऱ्याचदा रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर बीट खाण्याचा सल्ला दिला जातो. बीट खाल्ल्यामुळे रक्त वाढते, असे अनेक समज आणि गैरसमज सुद्धा आहेत.पण केवळ बीट खाल्ल्याचं नाहीतर आहारात वेगवेगळ्या भाज्यांचे सेवन केल्यामुळे सुद्धा रक्त वाढून शरीराला आवश्यक पोषण मिळते. कच्चे बीट खाल्ल्यानंतर अनेकांना ते सहज पचन होत नाही. बद्धकोष्ठता, अपचन किंवा ऍसिडिटीची समस्या उद्भवून पोटाचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाफवलेल्या बीटचे सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले सॅलड खाल्ल्यास शरीरात पोषक घटकांची अजिबात कमतरता निर्माण होणार नाही. याउलट आरोग्य चांगले राहील. चला तर जाणून घेऊया बीटरूट सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : विकेंड करा खास, घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल क्रिमी आणि मसालेदार ‘बटर चिकन’, रेसिपी आहे फार सोपी

साहित्य:

  • बीटरूट
  • गाजर
  • कांदा
  • दही
  • काळीमिरी पावडर
  • मीठ
  • कोथिंबीर
  • चिली फ्लेक्स
  • चाट मसाला
पावसाळ्यात आवर्जून खायला हवी करटोलीची रानभाजी, आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली भाजी शरीरासाठी ठरेल गुणकारी

कृती:

  • वाफलेल्या बीटचे सॅलड बनवण्यासाठी सर्वप्रथम, चाळणीवर साल काढून घेतलेले बीट ठेवा आणि ५ मिनिट एक वाफ काढून घ्या.
    वाफवून घेतलेले बीट, गाजर आणि इतर तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊन बारीक चिरून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये किसून घेतलेले बीट आणि इतर भाज्या घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला.
  • मिक्स केलेल्या मिश्रणात दही, काळीमिरी, चाट मसाला आणि चिली फ्लेक्स घालून व्यवस्थित मिक्स करा आणि त्यानंतर त्यात दही घालून मिक्स करून घ्या.
  • सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले बीटरूट सॅलड.

Web Title: Do you find raw beetroot hard to digest then whip up a quick beetroot salad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Benefits of beetroot
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
4

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.