पावसाळ्यात आवर्जून खायला हवी करटोलीची रानभाजी, आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली भाजी शरीरासाठी ठरेल गुणकारी
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात वेगवेगळ्या रानभाज्या उपलब्ध होतात. वर्षाच्या बाराही महिने बाजारात भेंडी, पत्ताकोबी, फ्लॉवर, पालक, मुळा इत्यादी वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध असतात. पण पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. त्यातील सगळ्यांच्या आवडीची भाजी म्हणजे करटोली. ही भाजी अतिशय आवडीने खाल्ली जाते. वरून काटेरी पण आतून मऊ असलेली भाजी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. या भाजीमध्ये प्रोटीन्स, ॲण्टीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. पावसाळ्यात शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी भाजीचे सेवन करावे. याशिवाय बद्धकोष्ठता, दमा, डोकेदुखी इत्यादी त्रासांपासून आराम मिळवण्यासाठी करटोलीची भाजी खावी. चला तर जाणून घेऊया अस्सल पारंपरिक पद्धतीने करटोलीची रानभाजी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
High Protein Fruits: प्रोटीनसाठी फक्त अंडीच नाही! ‘ही’ फळे ठरू शकतात उत्तम पर्याय






