Butter Chicken Recipe : रेस्टाॅरंटमध्ये मिळणारे बटर चिकन तर सर्वांच्याच आवडीचे ठरते. तुम्हाला माहितीये का? ही डिश तुम्ही घरी देखील अगदी सहज आणि सोप्या पद्धतीमध्ये तयार करु शकता. आता बटर चिकन खायला रेस्टाॅरंटला जाऊ नका, तर घरीच हा पदार्थ बन
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
लोकप्रिय भारतीय पदार्थांमध्ये बटर चिकनचे नाव हमखास घेतले जाते.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच याची चव फार आवडते.
आज आपण रेस्टाॅरंटची ही डिश घरी कशी बनवायची ते जाणून घेणार आहोत.
भारतीय खाद्यसंस्कृतीतील सर्वात लोकप्रिय आणि सर्वांच्या आवडीची डिश म्हटली तर बटर चिकनचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. उत्तर भारतातून प्रसिद्ध झालेली ही रेसिपी आज जगभरातील भारतीय रेस्टॉरंट्सच्या मेनूमध्ये आवर्जून दिसते. घरी बटर चिकन बनवताना अनेकदा रेस्टॉरंटसारखी चव, रंग आणि क्रीमीपणा मिळत नाही. मात्र योग्य प्रमाणात मसाले, चिकनचे मॅरिनेशन आणि ग्रेव्हीची योग्य पद्धत वापरली तर घरच्या घरीही अगदी हॉटेलसारखे बटर चिकन तयार करता येते. ही डिश बटर नान, तंदुरी रोटी, पराठा, जिरा राईस किंवा साध्या भातासोबतही तितकीच स्वादिष्ट लागते. खास पाहुण्यांसाठी, वाढदिवस, पार्टी किंवा विकेंड स्पेशल मेनूमध्ये ही रेसिपीनक्कीच सर्वांचे मन जिंकते.
दही, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, धने-जिरे पूड, गरम मसाला, लिंबाचा रस, मीठ आणि तेल एकत्र करून त्यात चिकन घाला. नीट मिक्स करून किमान १ ते २ तास मुरण्यासाठी ठेवा.
पॅनमध्ये थोडे बटर किंवा तेल गरम करून मॅरिनेट केलेले चिकन मध्यम आचेवर ८ ते १० मिनिटे शिजवा. चिकन पूर्ण शिजल्यावर बाजूला ठेवा.
टोमॅटो आणि काजू थोड्या पाण्यात १० मिनिटे उकळा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये अगदी गुळगुळीत पेस्ट तयार करा.
कढईत बटर आणि तेल गरम करून त्यात तमालपत्र, वेलदोडा आणि दालचिनी परता. नंतर आले-लसूण पेस्ट घालून सुवास येईपर्यंत परता. आता तयार टोमॅटो-काजूची पेस्ट घालून ८ ते १० मिनिटे शिजवा.
ग्रेव्हीत लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला, साखर आणि मीठ घालून चांगले मिसळा. आवश्यक असल्यास थोडे पाणी घालून ग्रेव्हीला योग्य घट्टपणा द्या.
शिजवलेले चिकन ग्रेव्हीत घालून ८ ते १० मिनिटे मंद आचेवर उकळी येईपर्यंत शिजवा, जेणेकरून चिकनमध्ये ग्रेव्हीची चव पूर्णपणे मुरेल.
शेवटी कसुरी मेथी हाताने चुरून घाला. त्यानंतर फ्रेश क्रीम आणि थोडे बटर मिसळा. दोन मिनिटे मंद आचेवर शिजवून गॅस बंद करा.
गरमागरम रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन बटर नान, लच्छा पराठा, तंदुरी रोटी, जिरा राईस किंवा साध्या वाफाळत्या भातासोबत सर्व्ह करा. वरून थोडी फ्रेश क्रीम आणि बटर घातल्यास डिश अधिक आकर्षक आणि स्वादिष्ट दिसते.
Web Title: Make restaurant style butter chicken at home recipe in marathi