Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Tips: डोळ्यांखाली वाढलेल्या सुरकुत्या आणि डार्क सर्कल्समुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग नियमित प्या ‘हे’ गुणकारी पेय

डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी कोणत्याही क्रीमचा वापर न करता हेल्दी पेयाचे सेवन करावे. यामुळे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते आणि चेहऱ्यावरील ग्लो वाढून त्वचा खूप जास्त सुंदर दिसते.

  • By सुरुची कदम
Updated On: May 27, 2026 | 09:45 AM
डोळ्यांखाली वाढलेल्या सुरकुत्या आणि डार्क सर्कल्समुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग नियमित प्या 'हे' गुणकारी पेय

डोळ्यांखाली वाढलेल्या सुरकुत्या आणि डार्क सर्कल्समुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग नियमित प्या 'हे' गुणकारी पेय

Follow Us
Follow Us:

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, झोपेची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव, चुकीच्या वेळी जेवण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर त्याचे परिणाम त्वचा आणि केसांवर लगेच दिसून येतात. त्यामुळे दैनंदिन आहारात पौष्टिक आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. त्वचेवर आलेल्या सुरकुत्या, काळे डाग, डार्क सर्कल्स, मुरूम घालवण्यासाठी महिला बरेच वेगवेगळे उपाय करतात. पण त्याचा फारसा परिणाम चेहऱ्यावर दिसून येत नाही. अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांभोवती काळे डाग आणि सुरकुत्या येण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

चेहऱ्यावरील थकवा होईल दूर! सुंदर आणि मऊ त्वचेसाठी घरी तयार करा होममेड फेसपॅक, चारचौघांमध्ये दिसाल देखण्या

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या लवकर त्वचेवरून निघून जात नाहीत. यासाठी वरून स्किन केअर रुटीन फॉलो करण्यासोबतच त्वचेला आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या आणि डार्क सर्कल्स घालवण्यासाठी कोणते उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चेहऱ्यावर आलेले काळे डाग आणि डार्क सर्कल्स घालवण्यासाठी बीट, चिया सिड्स, आलं, मध आणि पाणी इत्यादी पदार्थांपासून बनवलेले नैसर्गिक पेय प्यावे. यामुळे शरीरासोबतच त्वचेला सुद्धा खूप जास्त फायदे होतात आणि आरोग्य सुधारते. नैसर्गिक घटक त्वचा आतून हायड्रेट ठेवण्यासोबतच चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यास मदत करतात आणि त्वचा स्वच्छ करतात.

नैसर्गिक पेय बनवण्याची कृती:

मिक्सरच्या भांड्यात बीट, आलं आणि पाणी घालून बारीक वाटून घ्या. तयार केलेला ज्यूस गाळून त्यात भिजवलेले चिया सीड्स आणि मध घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर उपाशी पोटी सेवन करा. या पेयाच्या नियमित सेवनामुळे चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी होण्यासोबतच त्वचा आतून स्वच्छ आणि चमकदार राहील. तसेच त्वचेच्या रंगात सुद्धा बदल दिसून येईल. चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी कोणत्याही स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती आणि नैसर्गिक घटकांनी समृद्ध असलेल्या पेयांचे सेवन करावे.

काखेत वाढलेला काळेपणा आणि दुर्गंधीमुळे हैराण झाला आहात? ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमच आराम, बिनधास्त घाला स्लिव्हलेस

बीटमध्ये लोह, अँटी ऑक्सिडंट्स आणि जीवनसत्वे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते आणि त्वचा आतून स्वच्छ होते. बीटमध्ये असलेले नैसर्गिक घटक आतड्यांमधील घाण स्वच्छ करतात, ज्यामुळे चेहऱ्यावर मुरूम किंवा पिंपल्स येत नाहीत. त्वचेवरील निस्तेजपणा कमी करण्यासाठी आणि रक्तप्रवाह सुधारण्यासाठी बीटचा रस प्यावा. चिया सिड्समध्ये फायबर, ओमेगा-३ फॅटी असिड आणि प्रथिने इत्यादी अनेक घटक आढळून येतात, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. शरीरातील सूज, थकवा किंवा पचनाच्या समस्या कमी करण्यासाठी आल्याचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Dull skin due to wrinkles and dark circles under the eyes then drink this beneficial drink regularly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • Healthy Drinks
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

ओठ कायमच कोरडे होऊन फाटतात? मग महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी आहारात करा बदल, आठवडाभरात होतील गुलाबी ओठ
1

ओठ कायमच कोरडे होऊन फाटतात? मग महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी आहारात करा बदल, आठवडाभरात होतील गुलाबी ओठ

आतड्यांमध्ये साचलेली विषारी घाण क्षणार्धात पडून जाईल बाहेर! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा डिटॉक्स ड्रिंक, वजन होईल कमी
2

आतड्यांमध्ये साचलेली विषारी घाण क्षणार्धात पडून जाईल बाहेर! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा डिटॉक्स ड्रिंक, वजन होईल कमी

केसांच्या वाढीसाठी गोळ्या औषध खात असाल तर थांबा! घरगुती पद्धतीने बनवा नॅचरल बायोटीनची गोळी, नोट करून घ्या रेसिपी
3

केसांच्या वाढीसाठी गोळ्या औषध खात असाल तर थांबा! घरगुती पद्धतीने बनवा नॅचरल बायोटीनची गोळी, नोट करून घ्या रेसिपी

मानेवर साचून राहिलेल्या काळ्याकुटू थरांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास त्वचा होईल उजळदार आणि स्वच्छ
4

मानेवर साचून राहिलेल्या काळ्याकुटू थरांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास त्वचा होईल उजळदार आणि स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.