सध्याची जीवनशैली पाहाता, अगदी प्रत्येक जण नोकरीसाठी घराबाहेर जातो. अनेक वेळा आपल्याला जेवण बनवण्यासाठी वेळ मिळत नाही.आशावेळी बाहेरून जेवण ऑर्डर करतो. पण तेही काही रोज शक्य नाही. मग रात्रीचं उरलेलं दुपारी किंवा दुपारचं उरलेलं जेवण रात्री खातो.
अनेक वेळा डॉक्टर सल्ला देतातकी शिळे अन्न खाऊ नये. पण तुम्हाला माहिती आहे का, शिळ्या चपात्या खाल्ल्यास आपण्यास अनेक फायदे होऊ शकतात. दररोज दुधात मिसळून शिळी चपाती खाल्ल्यास तुमचा रक्तदाब आणिन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. शिळ्या चपात्यांमध्ये शरीराचे तापमान टिकवून ठेवण्याची गुणवत्ता असते. शिळ्या रोट्यामध्ये काही चांगले बॅक्टेरिया येतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. दुधासोबत शिळ्या चपात्या खाल्ल्यास दुबळेपणा दूर होतो आणि वजन वाढण्यास मदत होते. तुम्ही जीमला जात असाल तर शिळ्या चपात्या नक्कीच खाव्यात. जीममध्ये स्नायू वाढवणाऱ्यांसाठी शिळ्या चपात्या खूप फायदेशीर आहे.
पण काही वेळा काहीना शिळे अन्न पचन होत नाही. त्यांनी सेवन करताना डॉक्टरचा सल्ला घ्यावा.






