NOTAM : आधुनिक युद्धाची पहिली लाट भारतावर? चीन आणि पाकिस्तानने सुरु केले इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
1. मुंबई आणि नवी दिल्ली FIR मध्ये GPS हस्तक्षेपावरील NOTAM जारी
2. भारत, पाकिस्तान आणि चीनचे एकाच वेळी मोठे लष्करी सराव
3.अरबी समुद्रात वारंवार GPS अस्थिरता
China-Pakistan electromagnetic warfare : भारताच्या(India) हवाई सुरक्षेच्या इतिहासात प्रथमच मुंबई आणि नवी दिल्ली या दोन्ही महत्त्वाच्या फ्लाइट इन्फॉर्मेशन रीजन—FIR मध्ये—GPS सिग्नल हस्तक्षेपासंबंधी NOTAM जारी करण्यात आला. हा हस्तक्षेप साधा तांत्रिक बिघाड नसून, इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्धाचे (Electromagnetic Warfare) एक संभाव्य संकेत असल्याची गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
भारताच्या L639 आणि P574 सारख्या आंतरराष्ट्रीय उड्डाण मार्गांवर GPS-आधारित नेव्हिगेशन हा कणा मानला जातो. हे मार्ग लांब पल्ल्याची विमाने ETOPS मानकांनुसार उडवतात. मात्र GPS सिग्नल जॅम झाल्यास, वैमानिकांना जुन्या जमिनीवर आधारित नेव्हिगेशनवर परतणे भाग पडते—आधुनिक तंत्रज्ञानातील एक मोठा मागासपणा.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Tests : डोनाल्ड ट्रम्प यांनीच केली पाकिस्तानची पोलखोल; पाकच्या अनु चाचण्यांवर केले ‘असे’ खळबळ उडवणारे वक्तव्य
अरबी समुद्राच्या दिशेने वाढणारा GPS डिग्रेडेशन हा एक साधा इशारा नसून, अदृश्य युद्धाच्या सुरूवातीचे पहिले पाऊल मानले जाते.
ज्या प्रदेशातून युरोप-मध्य पूर्व-आग्नेय आशिया या दिशेने दररोज शेकडो विमाने उडतात, त्या मार्गावर GPS अस्थिरता निर्माण होणे म्हणजे क्षेत्रातील कोणीतरी शक्ती सिग्नल जॅमिंग किंवा स्पूफिंगची चाचणी घेत आहे.
सुरक्षा तज्ज्ञांच्या मते,
आधुनिक युद्धात गोळी लागण्यापूर्वी सिग्नल मरतात
GPS जॅमिंग, स्पूफिंग व इलेक्ट्रॉनिक हल्ले हेच आधुनिक संघर्षाची “पहिली लाट” असते
यात शत्रूची प्रतिक्रिया क्षमता नष्ट केली जाते
यामुळे GPS-संबंधित NOTAM ला आज धोरणात्मक इशारा मानले जात आहे.
India issues a NOTAM warning aircraft of GPS interference/loss around air traffic routes within its airspace near Mumbai, this follows reports of similar interreference observed around New Delhi Valid: 13-17 November 2025 pic.twitter.com/N568cd9zpz — Damien Symon (@detresfa_) November 13, 2025
credit : social media
GPS हस्तक्षेप कुठून येत आहे याचे उत्तर अद्याप स्पष्ट नाही. मात्र तीन प्रमुख शक्यता समोर आल्या आहेत—
मोठ्या लष्करी सरावांदरम्यान आपली EW क्षमता तपासणे सामान्य असते.
दोन्ही देश एकाच कालावधीत समुद्री व हवाई सराव करत आहेत.
उच्च-शक्तीचे जहाज रडार किंवा जॅमर भारताच्या नागरी क्षेत्रात सिग्नल व्यत्यय निर्माण करू शकतात.
प्रत्येक देश दुसऱ्याची क्षमता, प्रतिसाद आणि मर्यादा तपासत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Aurora Borealis: अमेरिका-कॅनडाच्या आकाशात रंगांची उधळण; ‘नॉर्दर्न लाईट्स’ने दाखवले स्वर्गीय दृश्य, पहा VIDEO
1. भारतीय तिन्ही सशस्त्र दलांनी पश्चिम व उत्तर भागात मोठे सराव सुरू केले
2. भारतीय हवाई दल लडाख ते ईशान्येकडे स्वतंत्र सराव करत आहे
3. पाकिस्तानी नौदलाने अरबी समुद्रात मोठी ‘नो-फायर’ समुद्री क्षेत्रे जाहीर केली
4. चीन तिबेटमध्ये उच्च तैनातीवर असून, हिंद महासागरात इलेक्ट्रॉनिक युद्ध क्रियाकलाप वाढवत आहे
ही सर्व घडामोडी एकाच वेळी होण्याचा अर्थ दक्षिण आशिया आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक संघर्षाच्या स्पर्धेत प्रवेशला आहे.
GPS अस्थिरतेच्या सतत येणाऱ्या घटना, भारताचे NOTAM, तिन्ही देशांचे सराव—या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यावर एक गंभीर प्रश्न उभा राहतो:
1.भारत, चीन आणि पाकिस्तानमध्ये अदृश्य इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध सुरू झाले आहे का?
किंवा
2.हा फक्त शक्ती चाचण्या करून भविष्यातील संभाव्य संघर्षासाठी केलेला रिहर्सल आहे?
तज्ज्ञ मात्र एकाच गोष्टीवर एकमत आहेत:
दक्षिण आशिया आता सिग्नल फ्रिक्वेन्सीवर लढल्या जाणाऱ्या आधुनिक युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे.






