हळदीचा त्वचा आणि केसांच्या आरोग्यसाठी केला जातो. हळदीमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा उजळण्यास मदत होते. हळदीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. मेकअप प्रॉडक्टमध्ये हळदीचा वापर केला जातो. प्रत्येक ऋतूमध्ये त्वचेची निगा राखण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का अतिप्रमाणात हळदीचा वापर केल्याने चेहऱ्यावरील चमक कमी होते? हळदीचा जास्त वापर केल्याने त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात. यामुळे चेहऱ्यावरील ग्लो कमी होऊन त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. त्यामुळे योग्य प्रमाणात हळदीचा वापर केला पाहिजे. चुकीच्या पद्धतीने हळदीचा वापर केला तर कोणत्या समस्या उद्भवतात चला तर जाणून घेऊया.
अतिप्रमाणात हळदीचा वापर केल्याने कोणत्या समस्या उद्भवतात:
ऍलर्जी होण्याची शक्यता:
त्वचेवरील डाग घालवण्यासाठी आपण घरी अनेक वेगवेगळे फेस पॅक किंवा फेस मास्क बनवतो. पण या फेस मास्कमध्ये योग्य प्रमाणात हळद वापरली पाहिजे. अन्यथा चेहऱ्यावरील चमक कमी होऊन त्वचा निस्तेज दिसू लागेल. तसेच ऍलर्जी होण्याची शक्यता असते. संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी हळदीचा वापर जपून करावा.
खाज सुटणे, जळजळ होऊ शकते:
संवेदनशील त्वचा असलेल्या महिलांनी कमी प्रमाणात हळदीचा वापर त्वचेसाठी केला पाहिजे. यामुळे त्वचेवर खाज किंवा जळजळ होऊ शकते. त्वचेसाठी हळदीचा वापर हानिकारक ठरू शकतो. त्वचेवर सतत खाज किंवा जळजळ होऊन डाग पडू शकतात. त्यामुळे संवेदनशील त्वचा असलेल्या महिलांना हळदीचा वापर अगदी कमी प्रमाणात करावा.
[read_also content=”चिकट त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी ‘या’ घरगुती फेसपॅकचा वापर करा, वाचा स्किनकेअर टिप्स https://www.navarashtra.com/lifestyle/use-these-homemade-face-packs-to-get-rid-of-sticky-skin-read-skincare-tips-539603.html”]
अशा पद्धतीने करा हळदीचा वापर:
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.