Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नसांमधील घट्ट रक्त ठरु शकतं हार्ट अटॅकचे कारण, उष्णतेत कसा वाढतो आजाराचा धोका? डाॅक्टरांनी केलं स्पष्ट

Heart Health Tips : वाढत्या उष्णतेचा आपल्या हृदयावर गंभीर परिणाम होत असतो. याकाळात जर आपण आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेतली नाही तर हृदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता असते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 28, 2026 | 08:15 PM
नसांमधील घट्ट रक्त ठरु शकतं हार्ट अटॅकचे कारण, उष्णतेत कसा वाढतो आजाराचा धोका? डाॅक्टरांनी केलं स्पष्ट

नसांमधील घट्ट रक्त ठरु शकतं हार्ट अटॅकचे कारण, उष्णतेत कसा वाढतो आजाराचा धोका? डाॅक्टरांनी केलं स्पष्ट

Follow Us
Follow Us:
  • वाढत्या तापमानामुळे शरीरावर दिसत नसलेला एक गंभीर ताण निर्माण होत असल्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे.
  • उन्हाळ्यात शरीरातील पाणी आणि आवश्यक घटकांची कमतरता काही आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकते.
  • डॉक्टरांनी उष्णतेच्या दिवसांत जीवनशैली आणि दैनंदिन सवयींबाबत विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
उत्तर भारतात मागील काही काळापासून उष्णतेच्या लाटा फार वाढल्या आहेत. वाढते तापमान फक्त डिहायड्रेशनची समस्या वाढवत नाही तर याचा आपल्या हृदयावरही परिणाम होत असतो. अनेकांना हे ठाऊक नाही पण वाढत्या उष्णतेमुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका अनेक पटींनी वाढत असतो. यामुळेच बदलत्या वातावरणासोबतच आपण आपल्या आरोग्याची अधिकाधिक काळजी घ्यायला हवी. याविषयी डाॅक्टरांचे काय म्हणणे आहे ते चला सविस्तर जाणून घेऊया.

Cold Water : थंड पाणी पिल्याने पोटाला नुकसान पोहचते का? तज्ञांकडून जाणून घ्या खरं सत्य

उष्णतेचा हृदयावर काय परिणाम होतो?

डाॅक्टरांच्या मते, वाढत्या उष्णतेचे प्रमाण शरीरातील कार्डियोवेस्कुलर सिस्टमवर गंभीर परिणाम करत असते. यामुळेच उन्हाळ्याच्या दिवसांत हार्ट डिसीज होण्याची शक्यता भरपूर असते. खरंतर जेव्हा तापमान जास्त उष्ण होते तेव्हा शरीर स्वत:ला थंड ठेवण्यात निकामी पडतो. उष्णतेमुळे शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी शरीर अधिक मेहनत घेतो ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, घाम येतो ज्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि यामुळेच हृदयविकार होण्याचा धोका अधिक वाढतो.

उष्णतेमुळे रक्त घट्ट बनते

जेव्हा उष्णता वाढते तेव्हा तापमानामुळे शरीरातील रक्त गोठायला लागते. यामुळे ब्लड फ्लोमध्ये व्यत्यत निर्माण होतो. स्लो ब्लड फ्लो होत असल्याने रक्ताला पंप करायला हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते ज्यामुळे हृदयावर ताण वाढतो. अशा परिस्थितीत हार्ट अटॅकचा धोका लक्षणीय वाढतो.

पोटॅशियम आणि सोडियमची कमतरता

वातावरणातील तापमान जेव्हा प्रचंड वाढते तेव्हा या उष्णतेमुळे आपल्याला खूप जास्त घाम यायला लागतो. या घामामुळे शरीरातील सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण कमी होते ज्यामुळे हार्ट डिसीज होण्याचा धोका वाढत असतो.

महागडे फेशिअल करणे कायमचे जा विसरून! दूधासारख्या नितळ चमकदार त्वचेसाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, त्वचेवर येईल नॅचरल गुलाबी ग्लो

उन्हाळ्यात हृदयाची काळजी कशी घ्यावी?

  • उन्हाळ्यात भरपूर पाण्याचे सेवन करायला हवे. पाण्यासोबतच तुम्ही तुमच्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करु शकता.
  • उन्हाळ्याच्या दिवसांत लोकांना दुपारी १२ ते ४ च्या दरम्यान बाहेर न निघण्याचा सल्ला दिला जातो. विनाकारण या वेळेत बाहेर जाणे टाळा.
  • जे आधीपासून हृदयाचे रोगी आहेत त्यांनी पाण्याचे जास्त सेवन करु नका. अशा लोकांनी डाॅक्टरांच्या सल्लानुसार पाण्याचे सेवन करावे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Extreme heatwave increase the risk of heart summer care tips lifetsyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • heart attack
  • heart problems
  • lifestyle news

संबंधित बातम्या

पोटाच्या समस्यांनी हैराण? तुमच्या ‘या’ रोजच्या सवयीच बिघडवतायत ‘गट हेल्थ’; पाहा काय टाळावं
1

पोटाच्या समस्यांनी हैराण? तुमच्या ‘या’ रोजच्या सवयीच बिघडवतायत ‘गट हेल्थ’; पाहा काय टाळावं

भिंतीचं प्लास्टर आणि पेंट निघतंय? एका सोप्या उपायाने भिंत करा पुन्हा नव्यासारखी
2

भिंतीचं प्लास्टर आणि पेंट निघतंय? एका सोप्या उपायाने भिंत करा पुन्हा नव्यासारखी

Pelvic Floor Exercises: प्रसूतीपूर्वीच लक्ष द्या! पेल्विक फ्लोर व्यायामाचे प्रसूतीनंतरही मिळतात ‘हे’ फायदे
3

Pelvic Floor Exercises: प्रसूतीपूर्वीच लक्ष द्या! पेल्विक फ्लोर व्यायामाचे प्रसूतीनंतरही मिळतात ‘हे’ फायदे

Raksha Bandhan Gift Ideas: राखीला यंदा चॉकलेट्स नको! भावाला आवडतील असे ‘हे’ ५ हटके गिफ्ट आयडिया
4

Raksha Bandhan Gift Ideas: राखीला यंदा चॉकलेट्स नको! भावाला आवडतील असे ‘हे’ ५ हटके गिफ्ट आयडिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.