उपाशी पोटी कोमट पाणी प्यावे की थंड पाणी? वजन कमी करण्यासाठी फॉलो करा जपानी वॉटर थेरपी, स्वच्छ होईल पोट
जपानी वॉटर थेरपी म्हणजे काय?
विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोणते पाणी प्रभावी?
सकाळी थंड की कोमट पाणी प्यावे?
सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं पाणी पिण्याची सवय असते. काहीजण थंड पाणी पितात तर काही कोमट पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करतात. उपाशी पोटी कोमट पाणी प्यायल्यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते, असे अनेकांना वाटते. तर उपाशी पोटी थंड पाणी प्यायल्यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर आणि मेटाबॉलिझमवर परिणाम होतो, असा समज निर्माण झाला आहे. पाणी पिण्याची पद्धत आणि पाण्याचे तापमान शरीराच्या पचनक्रियेवर परिणाम करते. शरीर डिटॉक्स करण्यासाठी आणि लिव्हर, किडनीचे कार्य सुरळीत चालू ठेवण्यासाठी कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. आज आम्ही तुम्हाला उपाशी पोटी कोमट पाणी प्यावे की थंड पाणी? वजन कमी करण्यासाठी जपानी वॉटर थेरपी कशी वापरावी? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पद्धतीने पाणी प्यायल्यास पोट स्वच्छ होण्यास मदत होईल आणि आतड्यांचे कार्य सुधारेल.(फोटो सौजन्य – istock)
अंड्याचे सेवन केल्यास शरीरात कोलेस्ट्रॉल वाढते का? जाणून घ्या अंडी खाण्याची योग्य पद्धत आणि फायदे
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पाणी पिण्याची सवय शरीराचे उर्जेवर परिणाम करते. पाण्याचे तापमान शरीराच्या पचनक्रियेवर आणि चयापचय क्रियेवर परिणाम करतात. ‘जपानी वॉटर थेरपी’ केल्यामुळे पचनक्रियेवरच नाहीतर संपूर्ण शरीराच्या कार्यावर परिणाम दिसून येतो. ही एक नैसर्गिकरित्या शरीर शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे. थंड पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराची चयापचय क्रिया थोड्या वेळासाठी मंदावते. थंड पाणी प्यायल्यामुळे शरीराचे तापमान पाण्याच्या तापमानापर्यंत आणण्यासाठी जास्तीची ऊर्जा खर्च करावी लागते. यामुळे जास्त कॅलरीज जाळल्या जातात आणि वजन कमी होण्यास कोणतीही मदत होत नाही.
झोपेतून उठल्यानंतर शरीराची पचनसंथा सुरु होते. त्यामुळे उठल्यानंतर अतिशय थंड पाण्याचे सेवन केल्यास शरीराच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. तसेच अन्न पचन होण्याची प्रक्रिया अतिशय मंदावते. तर सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याचे सेवन केल्यास अन्नपदार्थांमधील चरबी विरघळण्यास मदत होते. याशिवाय आतड्यांची हालचाल सुरळीत चालू राहते. बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी आणि संपूर्ण शरीर डिटॉक्स करण्यासाठी कोमट पाणी प्यावे. कोमट पाणी प्यायल्यामुळे पोट आणि शरीर स्वच्छ होते.
जपानमध्ये सकाळी उठल्यानंतर पाणी पिण्याच्या सवयीला एक विधी मानला जातो. यात दात घासण्याच्या आधी सुमारे 600 मिली म्हणजे ४ ग्लास कोमट पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे ४५ मिनिटं होईपर्यंत कोणत्याही पदार्थाचे सेवन करू नये. याशिवाय प्रत्येक जेवणानंतर २ तास पाणी पिऊ नये. ही पद्धत नियमित फॉलो केल्यास आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाईल आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यासोबतच पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. पाणी प्यायल्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. शरीरास आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी प्यायल्यास किडनी आणि लिव्हरमधील घाण बाहेर पडून जाते. तसेच शरीरातील कमी झालेली पाण्याची पातळी भरून निघते. मेंदूमध्ये वाढलेला थकवा कमी होऊन मेंदूचे कार्य सक्रिय राहते.






