विकेंड जवळ आला आहे. तुम्हाला विकेंड स्पेशल जर घरी काही टेस्टी आणि नवीन बनवून पाहायचे असेल तर आजची ही रेसिपी तुमच्या फायद्याच्या ठरणार आहे. तुम्ही याआधी गव्हाची पुरी तर अनेकदा खाल्ली असेल खुसखुशीत आणि कुरकुरीत पुरी कोणत्याही भाजीसोबत चवीला फार अप्रतिम लागते. मात्र यावेळी आम्ही तुम्हाला गव्हाची नाही तर तांदळाच्या पिठापासून चवदार पुरी कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत.
ही तांदळाची पुरी फार कमी वेळेत बनून तयार होते आणि विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला अधिकतर साहित्याचीही आवश्यकता भासत नाही. घरात नेहमीच उपलब्ध असलेल्या साहित्यापासून ही मसालेदार तांदळाची पुरी तयार करता येते. काहीतरी नवीन म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. हिची चव एकदा चाखली की तुम्ही हिला पुन्हा पुन्हा बनवत राहाल याची आम्हाला खात्री आहे. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – विकेंड बनवा खास! नाश्त्यासाठी बनवा सॉफ्ट-जाळीदार रवा इडली, पीठ आंबवण्याचीही गरज नाही
हेदेखील वाचा – वेटलॉस आणि मसल गेनसाठी घरीच तयार करा प्रोटीन पावडर, फार सोपी आहे रेसिपी