नेपाळचे नवे पंतप्रधान सनातनी हिंदू धर्माचे कट्टर पालक; भारताशी संबंध सुधारणार की बिघडणार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बालेन शाह हे नेपाळच्या महोत्तर जिल्ह्यातील मिथिला प्रदेशाशी संबंधित आहे. त्यांचे वडील डॉ. राम नारायण शाह आणि संपूर्ण संपूर्ण कुटुंब सनातनी परंपरांचे पालन करणारे आहे. सामाजिक कार्यक्रमात बालेन शाह यांनी जय जानकी आणि जय मिथिला घोषणांद्वारे आपल्या सांस्कृतिक ओळखीचा अभिमान व्यक्त केला आहे. त्यांनी काठमांडूचे महापौर झाल्यानंतरही आपली ही ओळख कायम ठेवली होती.
दरम्यान निवडणुकीतील विजयानंतर जनकपूर येथे झालेल्या सार्वजनिक सभेत त्यांनी राम-जानकी विवाहस्थळ असलेल्या पवित्र भूमिच्या विकासाची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले की, जनकपूर हे जगातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. मग येथील लोक डेस्टिनेशन वेडिंगसाठी जयूपर किंवा बालीला का जातात. यावर खंत व्यक्त करत त्यांनी जनकपूरमध्ये दरवर्षी कोट्यावधी पर्यटक येऊ शकतात. यासाठी तेथील नियोदजन आणि व्यवस्थापन करण्याची घोषणा केली. तसेच जनकपूरला जगातिक धार्मिक पर्यटक देश म्हणून आणण्याचा संकल्पही व्यक्त केला.






