इडली हा एक नाश्त्याचा प्रकार आहे. हा पदार्थ मूळ दक्षिण भारताचा आहे मात्र देशातील सर्वच भागात हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. मऊ इडली आणि त्यासोबत क्रिमी नारळाची चटणी आणि चटपटीत सांबर याला काही तोडच नाही! इडली हा पदार्थाचे फक्त भारतातच नाही तर परदेशातही फॅन्स आहेत. हा पदार्थ हॉटेलपासून रस्त्यापर्यंत अनेक जागी उपलब्ध असतो.
अनेकदा आपण ही इडली घरी बनवण्याचा विचार करतो मात्र घरी इडली बनवणे तितके सोपे नाही कारण यासाठी आधीच पीठ आंबवून ठठेवावे लागते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही पीठ न आंबवताही झटपट अगदी काही मिनिटांतच घरी इडली तयार करू शकता. आज आम्ही तुमच्यासोबत रवा इडलीची एक सोपी रेसिपी शेअर करत आहोत. ही इडली चवीला तर छान लागतेच शिवाय फार कमी वेळेत ही बनून तयार होते. तुम्हीही विकेंडला ही रवा इडली घरी बनवून पाहू शकता. रवा इडलीचा लागणारे साहित्य आणि कृती पाहुयात.
हेदेखील वाचा – वेटलॉस आणि मसल गेनसाठी घरीच तयार करा प्रोटीन पावडर, फार सोपी आहे रेसिपी
हेदेखील वाचा – सकाळच्या नाश्त्याला बनवा ओल्या नारळाचे स्वादिष्ट पराठे, झटपट तयार होते रेसिपी