नुकताच पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत नेहमीच काही ना काही चटपटीत आणि कुरकुरीत खाण्याची इच्छा होत असते. या ऋतूत चहाची मान फार उंचावली जाते, कारण अनेकजण या ऋतूत अधिकतर चहा पिण्याला प्राधान्य देत. आता चहा म्हंटल की, चहासोबत खाणारे स्नॅक्सचे पदार्थ आलेच. तुम्ही चहाबरोबर भजी खाल्ले असतील मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, या पावसाळ्यात थंड वातावरणात भजी नाही तर कुरकुरीत मिक्स डाळीचे कटलेट बनवून पहा. हे पौष्टिक कटलेट चवीबरोबरच आरोग्यसाठीही फायदेशीर आहेत. तसेच यांची चव घरातील सर्वांनाच फार आवडेल. हा पदार्थ तुमच्या संध्यकाळला आणखीन रंगत आणेल. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – Breakfast Recipes: निरोगी राहण्यासाठी ‘या’ हेल्दी नाश्ता रेसिपींनी करा सकाळची सुरुवात