Immortal Jellyfish : 'हा' समुद्री जीव म्हणजे चक्क मृत्यूला आव्हान देणारा महासागरातील चमत्कार अन् एकमेव ‘बायोलॉजिकल रीसेट बटण’ ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
अमर जेलीफिश (Turritopsis dohrnii) हा जगातील एकमेव प्राणी जो मृत्यूच्या उंबरठ्यावरून पुन्हा बाल्यावस्थेत परत येतो.
जखम, ताण किंवा उपासमार झाली तरीही हा जीव स्वतःचे शरीर ‘रीसेट’ करून पुन्हा तरुण बनतो.
त्याच्यातील ‘ट्रान्सडिफरेंशिएशन’ प्रक्रियेने पेशी स्वतःचा प्रकार बदलतात आणि जीवनचक्र नव्याने सुरू होते.
immortal jellyfish Turritopsis dohrnii : जगात अमरत्व हा शब्द फक्त पुराणकथांमध्येच दिसतो देव, असुर किंवा अद्भुत शक्ती असणारे अपराजित जीव. पण निसर्ग कधी कधी मानवी समजुतीला चकित करणारे रहस्य समोर आणतो. अशाच एका अतुलनीय जीवाचे नाव आहे अमर जेलीफिश (immortal jellyfish) किंवा वैज्ञानिक भाषेत Turritopsis dohrnii. हा असा जीव आहे जो शास्त्रज्ञांना आजही चकीत करतो, कारण तो प्रौढ अवस्थेतून पुन्हा बाल्यावस्थेत परत येण्याची अनोखी क्षमता बाळगतो. म्हणजेच, मृत्यू जवळ आला की हा जीव जीवनचक्राची उलटी दिशा पकडतो.
जेव्हा ही जेलीफिश जखमी होते, भुकेमुळे दुर्बळ होते किंवा अतिताणाचा सामना करते, तेव्हा इतर जीवांसारखी मृत्यूकडे झुकत नाही. उलट ती स्वतःला सुरुवातीच्या रुपात बदलते. याला आयुष्याचे पुनरुज्जीवन (rejuvenation) म्हणता येईल. प्रौढ जेलीफिशला मेडुसा म्हणतात. संकट जवळ येताच मेडुसा स्वतःला आकुंचन करते, आपल्या कोनयुक्त तंतूंचा त्याग करते आणि सिस्ट नावाच्या लहान गोळ्यात बदलते. फक्त २४ ते ३६ तासांत, हा सिस्ट पॉलीप बनतो जेलीफिशच्या जीवनचक्रातील पहिली आणि सर्वात मूलभूत अवस्था. हा पॉलीप समुद्राच्या तळाशी चिकटून बसतो आणि हळूहळू त्यातून नवीन जेलीफिशचे अंकुर तयार होतात. हे अंकुर वाढून पुन्हा प्रौढ जेलीफिश होतात एक प्रकारे अमरत्वाचे चक्र. असे झाले की, एकच जेलीफिश हजारो पिढ्या निर्माण करू शकते, आणि तरीही स्वतःचा जीव सोडत नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Southern Spear: अमेरिका-व्हेनेझुएला संघर्ष उंबरठ्यावर? ट्रम्प यांनी उचलेल ‘असे’ अत्यंत निर्णायक पाऊल
अमर जेलीफिशचे अमरत्व ट्रान्सडिफरेंशिएशन या अत्यंत दुर्मिळ जैविक प्रक्रियेमुळे शक्य होते. या प्रक्रियेत, शरीरातील एका प्रकारच्या पेशी दुसऱ्या प्रकारात परिवर्तित होतात. उदा., स्नायूंची पेशी त्वचेच्या पेशीत रुपांतर करू शकते! मानवी शरीरात हा प्रकार जवळजवळ अशक्य मानला जातो; म्हणूनच या जेलीफिशला निसर्गाचे अनोखे वरदान म्हटले जाते. या जीवामध्ये अशा विशिष्ट जीन्स असतात जे पेशींना तरुण अवस्थेत परत येण्याचा ‘आदेश’ देतात जसे की संगणक रीस्टार्ट केल्यावर सिस्टम पुन्हा नव्याने सुरू होते. म्हणूनच वैज्ञानिक या जेलीफिशला एजिंग रिसर्चमध्ये सुवर्णसंधी मानतात. मानवाला भविष्यात दीर्घायुष्य देण्यासाठी या प्रक्रियेवर संशोधन सुरू आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : GEN-Z protests : नेपाळनंतर आता ‘या’ देशात भडकले जेन-झी; सत्तापालटाची दाट शक्यता, देशभर आंदोलनांची धग
जरी ही जेलीफिश नैसर्गिक मृत्यूपासून वाचू शकते, तरीही ती पूर्णपणे अजेय नसते. मोठ्या माशांचे आक्रमण, समुद्री प्रदूषण किंवा पर्यावरणीय संकटे यांतून ती वाचू शकत नाही. तरीही, अशी क्षमता कोणत्याही प्राण्यात आढळत नसल्याने हा महासागरातील सर्वात अद्भुत जीव मानला जातो. अमर जेलीफिश ही निसर्गाने दिलेली एक अविश्वसनीय जीवशास्त्रीय कोडी आहे. मृत्यूला आव्हान देत आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करण्याची तिची शक्ती जगाला स्तंभित करते. जर निसर्ग असा चमत्कारिक जीव निर्माण करू शकतो, तर मानवजात एका दिवसात वृद्धत्वावर मात करेल का? उत्तर अजूनही अज्ञात आहे… पण हा जीव त्या दिशेचा पहिला दीपस्तंभ नक्कीच आहे.






