सौदी अरेबियाला प्रवास करणे आता सोपे राहिले नाही, नवीन advisory जाणून घ्या ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
https://cds.sfda.gov.sa या पोर्टलचा वापर करून औषधांची तपासणी आणि परवाना मिळवण्याचे आवाहन NCB ने केले आहे.NCB advisory for Indian travelers to Saudi Arabia : जर तुम्ही हज, उमराह किंवा नोकरी-व्यवसायानिमित्त सौदी अरेबियाला(Saudi Arabia) जाण्याच्या तयारीत असाल, तर तुमच्या प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी औषधांशी संबंधित नवीन नियम जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सौदी अरेबिया सरकारने परदेशी प्रवाशांसाठी एक नवीन ट्रॅव्हल अॅडव्हायझरी (Travel Advisory) जारी केली असून, औषधे नेण्यासाठी आता ऑनलाईन परवानगी घेणे अनिवार्य केले आहे. ही माहिती भारताच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कडून अधिकृतपणे देण्यात आली आहे.
सौदी अरेबियाच्या ‘जनरल डायरेक्टरेट ऑफ नार्कोटिक्स कंट्रोल’ (GDNC) ने भारतातून जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक विशेष डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. या नियमानुसार, तुमच्याकडे नियमित आजाराची औषधे असली तरीही, त्यांची माहिती ऑनलाइन पोर्टलवर देणे आवश्यक आहे. काही औषधे भारतात ओव्हर-द-काउंटर (डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय) मिळत असली, तरी सौदीच्या कायद्यानुसार ती ‘नार्कोटिक्स’ किंवा ‘सायकोट्रोपिक’ श्रेणीत येऊ शकतात. अशा वेळी तुमच्याकडे ऑनलाईन परवाना नसल्यास तुम्हाला विमानतळावर गंभीर कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War Alert : ‘अमेरिकेने लायकीत राहावे…’ इराणने ट्रम्पला हस्तक्षेप न करण्याची दिली आक्रमक धमकी
सौदी फूड अँड ड्रग अथॉरिटीने (SFDA) यासाठी Controlled Drug System (CDS) पोर्टल कार्यान्वित केले आहे. प्रवाशांना https://cds.sfda.gov.sa या वेबसाइटवर जाऊन स्वतःचा किंवा आपल्या प्रतिनिधीमार्फत अर्ज सादर करावा लागेल. अर्जामध्ये औषधाचे नाव, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन (Prescription) आणि औषधांचे प्रमाण याची अचूक माहिती देणे आवश्यक आहे. एकदा का प्रशासनाने मंजुरी दिली की, तुम्हाला एक ‘इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स’ मिळेल, जो विमानतळावर दाखवणे बंधनकारक असेल.
📢 Saudi Arabia has launched an electronic service platform for prior permission to carry medicines for personal use while entering or exiting the Kingdom. 🇮🇳 Indian travellers are advised to check permissibility of medicines & obtain required approvals before travel. 👉 The… pic.twitter.com/5SE9sG9pQd — All India Radio News (@airnewsalerts) January 2, 2026
credit : social media and Twitter
केवळ परवानगी घेऊन चालणार नाही, तर औषधांच्या प्रमाणावरही कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. प्रवाशांनी स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी ठराविक मर्यादेतच औषधे सोबत ठेवावीत. जर विहित प्रमाणापेक्षा जास्त औषधे आढळली, तर ती ‘तस्करी’ म्हणून गृहीत धरली जाऊ शकतात. अनेकदा भारतात सर्दी-खोकल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही औषधांमध्ये अशी घटकद्रव्ये असतात जी सौदीमध्ये प्रतिबंधित आहेत, त्यामुळे प्रवाशांनी अधिकृत यादी पाहूनच औषधे पॅक करावीत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Yemen Conflict : तेलसमृद्ध प्रांतासाठी संघर्ष! येमेनच्या रणांगणात Saudi-UAE फुंकणार युद्धाचे रणशिंग
भारतीय नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “सौदीमध्ये औषधांच्या बाबतीत कायदे अत्यंत कडक आहेत. आपली औषधे कोणत्या श्रेणीत येतात याची खात्री प्रवाशांनी प्रवासाच्या किमान १५ दिवस आधी करावी आणि आवश्यक परवानगी मिळवावी,” असे NCB च्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दीर्घकालीन आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी आपली कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्यात दिरंगाई करू नये.
Ans: प्रवाशांनी सौदी सरकारच्या अधिकृत पोर्टल https://cds.sfda.gov.sa वर नोंदणी करणे अनिवार्य आहे.
Ans: प्रवाशांना त्यांच्या डॉक्टरांची अधिकृत चिठ्ठी (Prescription) आणि औषधांचा तपशील देणारा वैद्यकीय अहवाल अपलोड करावा लागेल.
Ans: परवानगी न घेता किंवा मर्यादेपेक्षा जास्त औषधं नेल्यास ती जप्त केली जाऊ शकतात आणि प्रवाशावर कायदेशीर कारवाई किंवा दंड होऊ शकतो.






