ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भाजपवर निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी साताऱ्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीवर भाष्य करत भाजपवर निशाणा साधला आहे. अनेकदा राष्ट्रवादीवर टीका करणाऱ्या लक्ष्मण हाकेंनी यावेळी भाजपवर टीका केल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. लक्ष्मण हाके म्हणाले की, “भारतीय जनता पार्टीने आपली घोषणा बदलावी काँग्रेस राष्ट्रवादी युक्त भाजपा अशी करावी. भयग्रस्त पार्टी म्हणून भाजपाची ओळख झाली आहे. अनेक पक्षातील आयात उमेदवार घेतल्याशिवाय आपण जिंकू शकत नाही. सर्वात घाबरलेली पार्टी म्हणून भाजपाची ओळख निर्माण झाली आहे,” अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.
हे देखील वाचा : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप आज फुंकणार प्रचाराचे रणशिंग; मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लागले लक्ष…
पुढे ते म्हणाले की, “तर जे लोक महानगरपालिकेमध्ये बिनविरोध झाले आहेत त्यांनी असं काय काम केलं आहे ते बिनविरोध झाले. त्यांचे कॅरेक्टर तपासून पहावेत, भाजप म्हणते ओबीसी आमचा डीएनए, कुठे आहे? आता भाजपाचा DNA भाजपामध्ये नाही,” अशा शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी टीकास्त्र डागले.
हे देखील वाचा : महापालिका निवडणुकीत मोठा ट्वीस्ट; मनसेचे दोन उमेदवार नॉट रिचेबल, कालपासून एकही फोन नाही
त्याचबरोबर लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर देखील जोरदार टीका केली. अजित पवार आणि शरद पवार हे आधीपासून एकत्र असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. लक्ष्मण हाके म्हणाले की, “मोहोळ काय आणि अजित दादा काय एका नाण्याच्या दोन बाजू फुले शाहू आंबेडकरांचे नाव घ्यायचं आणि पाहुणे रावळ्यांचा राजकारण करायचं. अजित पवारांची नीती म्हणजे काकांची नीती आहे. ते गुंडांचं राजकारण करत करतात. तर पवारांचे दात तोंडात नाहीतर पोटात आहे. शरद पवार आणि अजित पवार पहिल्यापासून एकच होते. मताला आम्ही आणि लाभ घ्यायचे वेळ आली की कुटुंब म्हणन एकत्र येतात. एका बाजूला मराठा कुणबीचे तिकीट दिलं की दुसरा सुद्धा तेच करतो. कोणाच्या जागेवर तर ओबीसीच्या जागेवर हे तिकीट देण्यात येतं,” असा आरोप ओबीसी नेते आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केला आहे.






