Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Gulgule Recipe : गुलगुले हा पदार्थ प्रामुख्याने गव्हाचे आणि गुळ घालून तयार केला जातो. चहासोबत याची चव अप्रतिम लागते. तुम्ही देवाच्या प्रसादासाठीही हा हलका गोड, बाहेरुन कुरकुरीत आणि आतून मऊ असा पदार्थ तयार करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 05, 2026 | 09:40 AM
Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • गुलगुले हा पारंपारिक हलका गोड, मऊ आणि बाहेरुन हलका कुरकुरीत असणारा पदार्थ आहे.
  • देवाच्या प्रसादासाठी किंवा चहासोबत नाश्ता म्हणून हा पदार्थ परफेक्ट ठरतो.
  • चला स्टेप बाय स्टेप याची रेसिपी जाणून घेऊया.
गुलगुले हा महाराष्ट्रातील पारंपरिक गोड पदार्थ असून घरात उपलब्ध असणाऱ्या मोजक्या साहित्यापासून तो सहज तयार करता येतो. गूळ, गव्हाचे पीठ आणि थोडेसे तूप किंवा तेल यांचा वापर करून बनवलेले हे गोड गोळे बाहेरून किंचित कुरकुरीत आणि आतून मऊसर लागतात. चहासोबतचा नाश्ता, सण-समारंभ किंवा अचानक काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली तरी गुळगुळे हा सोपा आणि झटपट पर्याय ठरतो. फार पूर्वीपासून खास प्रसंगी गुलगुले बनवण्याची परंपरा पाळली जात आहे. अशात सणांच्या या महिन्यात घरी झटपट असा गोड पदार्थ तयार करण्यासाठी तुम्ही या पदार्थाची निवास करू शकता. चला तर मग, घरच्या घरी मऊ आणि स्वादिष्ट गुलगुले कसे बनवायचे याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

साहित्य

  • 2 कप गव्हाचे पीठ
  • 1 कप किसलेला गूळ
  • अर्धा कप पाणी
  • 2 चमचे रवा
  • 1/2 चमचा वेलची पूड
  • 1/2 चमचा बडीशेप
  • 1 चिमूटभर मीठ
  • 1 चमचा तूप
  • तळण्यासाठी तेल
Mathura Peda Recipe:  यंदाच्या जन्माष्टमीला कान्हासाठी बनवा मथुरेचे प्रसिद्ध पेढे! जाणून घ्या ‘ही’ सोपी रेसिपी

कृती

  • एका भांड्यात गूळ घ्या. त्यात अर्धा कप कोमट पाणी घालून गूळ पूर्णपणे विरघळवून घ्या. गुळात माती किंवा अशुद्धता असल्यास मिश्रण गाळून घ्या.
  • एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ, रवा, वेलची पूड, बडीशेप, मीठ आणि तूप घाला. त्यात गुळाचे पाणी थोडे थोडे घालत मऊसर पीठ मळून घ्या.
  • मळलेले पीठ झाकून साधारण 15 ते 20 मिनिटे ठेवून द्या. यामुळे रवा आणि पीठ व्यवस्थित फुगते आणि गुलगुले आतून मऊ होतात.
    पीठाचे छोटे गोळे करून हाताला थोडे पाणी किंवा तेल लावून ते हलकेच चपटे करा. गुलगुले फार पातळ करू नका, अन्यथा ते कडक होऊ शकतात.
  • कढईत मध्यम आचेवर तेल गरम करा. तेल पुरेसे गरम झाल्यावर एक छोटासा पीठाचा तुकडा तेलात सोडून पाहा. तो हळूहळू वर आला तर तेल योग्य तापमानाला आले आहे.
  • कढईच्या आकारानुसार काही गुलगुले तेलात सोडा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि छान फुगलेले होईपर्यंत तळा. आच खूप मोठी ठेवू नका, कारण बाहेरून पटकन रंग येऊन आतून कच्चे राहू शकतात.
  • तळलेले गुलगुले टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल निघू द्या. त्यानंतर तयार गुलगुले चहासोबत किंवा स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी सर्व्ह करा.
 

Web Title: Ganeshotsav 2026 know how to make gulgule at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश
1

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’
2

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’
3

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’

Navratri 2026 : नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेला अर्पिण करा मखाना-नारळाची चवदार बर्फी, रेसिपी नोट करा
4

Navratri 2026 : नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेला अर्पिण करा मखाना-नारळाची चवदार बर्फी, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.