सध्या देशभरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. हिंदू धर्मातील पवित्र सणांगणेशोत्सव हा एक सण आहे. या सणानिमित्त सर्वांचे लाडके बाप्पा आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी धर्तीवर अवतरतात. यानिमित्त ठिकठिकाणी गणपतीची मोठ्या भक्तीभावाने प्राणप्रतिष्ठा केली जात आहे. याकाळी गणेशाची मूर्ती घरात बसवून त्याची मनोभावनेने पूजा केली जाते आणि बाप्पाला त्याच्या आवडीचा नैवेद्य अर्पण केला जातो. याकाळात घरासमोर वेगवगेळ सुबक रांगोळी देखील काढली जाते. मात्र तुम्हाला जर रांगोळी काढता येत नसेल आणि बाप्पासाठी काही खास करायचे असेल तर आजचा हा भन्नाट व्हिडिओ एकदा नक्की बघा. या व्हिडिओमध्ये विड्याच्या पानांपासून बाप्पाची सुबक कलाकृती कशी साकारायची ते दाखवण्यात आले आहे.
व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे की, सुरुवातीला 8 विड्याचे पान घ्या. त्यानंतर सुरुवातीला एक पान ठेवा त्यानंतर त्याच्या बाजूला गणपतीच्या कानाचा आकार देत दोन्ही बाजून दोन पान ठेवा. त्यानंतर गणपतीचा पोटाचा आकार देण्यासाठी मध्येभागी ठेवलेल्या पानाच्या खाली आणखी एक पान ठेवा. त्यानंतर गणपतीच्या हातासाठी दोन पान त्याच्या शेजारी ठेवा आणि शेवटी गणपतीचे पाय साकारण्यासाठी दोन पान आडवे ठेवा. सर्वात वरती मध्यभागी ठेवलेल्या पानावर टिळा लावा. पानांपासून गणपती साकारलेला दिसून येईल. अशाप्रकारे कोणत्याही रांगोळीचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही असा विड्याच्या पानांचा सुबक गणपती साकारू शकता.
हेदेखील वाचा – गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा स्वादिष्ट गोड पुरणपोळी, वाचा सोपी रेसिपी
हा भन्नाट व्हिडिओ @im_mounika_92 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये पानांचा गणेश (Leaf Ganesha) असे लिहिण्यात आले आहे. हा व्हिडिओ अनेक युजर्स आवडला असून सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट्स करत यावर आपल्या मेजशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सुंदर आणि क्रिएटिव्ह” तर एका युजरने लिहिलेय, “खूपच सुंदर!!!” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “किती सुंदर गणपती साकारला आहे.”
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi Recipe: बाप्पाला करा खुश! नैवेद्यासाठी बनवा कुरकुरीत तळणीचे मोदक
दरम्यान गणेशोत्सवनिमित्त सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ शेअर होत असतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारे लोक गणपतीच्या आगमनासाठी कशी तयारी करावी यासाठीच्या अनेक टिप्स शेअर करत असतात. असे व्हिडिओ सोशल मीडियावर ,मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोकांना असे व्हिडिओ पाहायला फार आवडतात.