लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना पाटीवरची पेन्सिल, माती, स्लेट किंवा कच्चा तांदूळ खाण्याची सवय असते. कच्चे तांदूळ चावून खाल्ल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही. पण चव म्हणून खाल्लेले जाणारे कच्चे तांदूळ आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतात. दात, आतड्यांसंबंधित समस्या उद्भवून आरोग्य बिघडते. चला तर जाणून घेऊया कच्चे तांदूळ खाल्ल्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम. (फोटो सौजन्य – istock)
तुम्हाला सुद्धा कच्चा तांदूळ खाण्याची सवय आहे का? मग शरीरावर होतील 'हे' गंभीर परिणाम

कच्चे तांदूळ पचन करण्यासाठी शरीराला खूप जास्त त्रास होतो. तील स्टार्च पूर्णपणे शिजवल्यानंतरच पचन होतात. कच्चे तांदूळ खाल्ल्यामुळे गॅस, अपचन, पोटदुखी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवतात.

न शिजवलेला भात खाण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागते. यामुळे दातांचे आरोग्य पूर्णपणे खराब होऊन जाते. तांदूळ खाल्ल्यामुळे दातांचा मुलामा कमकुवत होऊ हिरड्यांमध्ये वेदना वाढतात.

न शिजवलेल्या तांदुळामुळे विषबाधा होण्याची जास्त शक्यता असते. उलट्या आणि जुलाब, बॅक्टेरिया किंवा बुरशीचे प्रजनन वाढून आरोग्य बिघडते.

कच्चा तांदूळ खाल्ल्यामुळे किडनीमध्ये स्टोन होतात. स्टोनची वाढ झपाट्याने झाल्यानंतर आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते.

कच्चे तांदूळ खाल्ल्यामुळे थकवा, अशक्तपणा वाढण्याची जास्त शक्यता असते. यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होऊन जाते आणि आरोग्य बिघडते.






