हिंदू नववर्षाची (Hindu New Year) सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून होते. याबरोबरच चैत्र नवरात्री आणि गुढीपाडवा हा सण या दिवशी साजरा केला जातो. गुढीपाडवा (Gudi Padwa 2022) हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा आरंभ करण्यासाठी हा उत्तम मुहूर्त समजला जातो. यामध्ये नूतन संवत्सराची सुरुवात, म्हणून चैत्र (Chaitra Pratipada) शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा महत्त्वाचा शुभ मानला जातो. गुढीपाडव्याला पछडी, उगादी आणि संवत्सरा पाडो असेही म्हणतात. हा सण कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशात साजरा केला जातो. गुढीपाडव्याची तारीख, शुभ वेळ आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या.
[read_also content=”तब्बल १५०० वर्षांनंतर हिंदू नववर्षाची सुरुवात असलेल्या गुढी पाडव्याला आहे अत्यंत दुर्मिळ योग! या राशींचे नशिब फळफणार https://www.navarashtra.com/lifestyle/gudi-padva-the-beginning-of-hindu-new-year-after-1500-years-is-a-very-rare-yoga-the-fortunes-of-these-zodiac-signs-will-bear-fruit-nrvk-261767.html”]
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त (Gudi Padwa 2022 Muhurta)
फाल्गुन अमावस्या १ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ वाजून ५३ मिनिटांनी संपलेल. तेव्हा अमावस्या संपल्यानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल आणि दुसऱ्या दिवशी २ एप्रिल २०२२ च्या रात्री ११ वाजून ५८ मिनिटांपर्यंत राहील. तिथीनुसार हा उत्सव २ तारखेला साजरा केला जाईल. या दिवशी अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे दोन्ही योग अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जातात.
फाल्गुन अमावस्या १ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ वाजून ५३ मिनिटांनी संपलेल. तेव्हा अमावस्या संपल्यानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल आणि दुसऱ्या दिवशी २ एप्रिल २०२२ च्या रात्री ११ वाजून ५८ मिनिटांपर्यंत राहील. तिथीनुसार हा उत्सव २ तारखेला साजरा केला जाईल. या दिवशी अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे दोन्ही योग अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जातात.
गुढीपाडवा हा अतिशय शुभ सण मानला जातो. या सणाबद्दल असे मानले जाते की, या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली. या दिवसापासून सत्ययुगाची सुरुवात झाली.
कशी उभाराल गुढी ?
या दिवशी घराबाहेर आंब्याच्या पानाचे तोरण लावणे शुभ मानले जाते. तसेच, गुढी उभी करण्यासाठी आपण जी काठी वापरणार आहोत ती स्वच्छ धुऊन, पुसून घ्यावी. त्याला रेशमी वस्त्र बांधून त्यावर एखादे चांदीचे भांडे किंवा घरातील कोणतेही स्वच्छ भांडे ठेवावे. गुढीला कडुनिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या बांधाव्यात, साखरेची माळ घालावी. गुढीपाडव्याचा दिवस आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी खास पदार्थ तयार केले जातात. या दिवशी गोड भाकरी, आमटी, पुरणपोळी केली जाते. गुढीपाडव्याबद्दल असे म्हटले जाते की, रिकाम्या पोटी पुरणपोळीचे सेवन केल्याने त्वचाविकारांची समस्याही दूर होते.
गुढीपाडव्याचा सण वास्तूनुसार चांगला मानला जातो. यामध्ये कडुलिंबाची पाने आणि साखरेचा वापर केला जातो. कडुनिंब म्हणजे जीवनातील कटू घटना, मिश्री म्हणजे आनंददायक घटना म्हणजे जीवनातील वास्तविक घटना दर्शवितात.