Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर 'या' आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Best Ropeway in India : पर्वतांचा विचार आला की हिरवळ, थंडावा, धुक्याने भरलेली हवा आणि शांतता डोळ्यांसमोर उभी राहते. पण आज या पर्वतरांगांमध्ये प्रवास करण्याची पद्धतही बदलली आहे. ट्रेकिंग, जीप सफारी किंवा रोड ट्रिप याशिवाय आता प्रवासी रोपवे राईड्सकडे अधिक आकर्षित होत आहेत. कारण या केबल राईड्स तुम्हाला नुसता प्रवासच घडवत नाहीत तर थेट आकाशातून दऱ्या, पर्वत आणि बर्फाच्छादित शिखरे डोळ्यांत साठवण्याची अद्वितीय संधी देतात. भारतातील अशा काही अविस्मरणीय रोपवे राईड्स आज आपण पाहूया.
आशियातील सर्वात उंच रोपवे म्हणून प्रसिद्ध असलेली गुलमर्ग गोंडोला तब्बल ४२०० मीटर उंचीवर नेते. बर्फाने झाकलेली झाडे, पसरलेले डोंगर आणि खोल दऱ्या पाहताना तुम्हाला हिवाळ्यातील एखाद्या अद्भुत परीकथेत प्रवेश केल्यासारखे वाटते. काश्मीरची सफर या गोंडोला राईडशिवाय अपुरीच मानली जाते.
हे देखील वाचा : Work From Anywhere : रिमोट वर्कसाठी भारतातील ‘ही’ 6 ऑफबीट ठिकाणे आहेत सर्वात Trending
औली येथील रोपवे हा भारतातील सर्वात लांब केबल कार प्रवासांपैकी एक आहे. जवळपास ४ किमी अंतर कापणाऱ्या या राईडसाठी २०-२५ मिनिटे लागतात. या दरम्यान नंदा देवी, त्रिशूल आणि मान पर्वतांची बर्फाळ शिखरे डोळ्यांत सामावतात. उन्हाळ्यात सोन्याचा रंग तर हिवाळ्यात पांढरं बर्फ पर्वतांना वेगळीच शोभा देतो.
मनाली ट्रिपचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे सोलांग व्हॅली ते माउंट फतरू दरम्यानची रोपवे सफर. फक्त १० मिनिटांचा हा छोटासा प्रवास असला तरी त्यात तुम्हाला हिरव्यागार दऱ्या, बर्फाच्छादित शिखरे आणि रोमांचकारी दृश्यांचा अद्भुत अनुभव मिळतो.
देवराली ते ताशिलिंग सचिवालयापर्यंत सुमारे एक किमी अंतराचा हा प्रवास २० मिनिटांचा आहे. एका केबल कारमध्ये २४ पर्यटक बसू शकतात. वरून दिसणारी तीस्ता व्हॅली, कांचनजंगा पर्वत आणि रंगीबेरंगी छप्परांनी सजलेले गंगटोक शहर प्रवाशांना अविस्मरणीय अनुभव देतात.
नॉर्थ पॉइंट ते सिंगला असा १५ मिनिटांचा हा प्रवास चहाच्या बागा, धबधबे आणि लहान शेतांमधून जातो. ही राईड रोमँटिक दृश्यांसाठी ओळखली जाते. त्यामुळे कपल्स आणि फोटोग्राफीप्रेमींसाठी ही सर्वोत्तम सफर ठरते.
सापुतारा येथील रोपवे तलाव आणि टेकड्यांना जोडतो. फक्त ५-७ मिनिटांचा हा छोटा प्रवास असला तरी सूर्यास्ताच्या वेळी घेतलेली ही सफर सोनेरी क्षणांची जादुई भेट ठरते. शांतता आणि सौंदर्य शोधणाऱ्यांसाठी हा अनुभव अप्रतिम आहे.
हे देखील वाचा : National Black Cat Appreciation Day : इजिप्तपासून भारतापर्यंत… काय आहे ‘Black Cat’s’ चा गूढ इतिहास?
रोपवे राईड्स हा केवळ प्रवासाचा एक मार्ग नाही, तर आकाशातून निसर्गाशी संवाद साधण्याची संधी आहे. प्रत्येक डोंगराळ प्रदेशात असलेली ही सफर तुम्हाला निसर्गाच्या जवळ आणते आणि एक आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव देते.