नवी मुंबईतील नेरुळ येथे शिवसेना ठाकरे गटातर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडूच्या मातीची गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत लहानग्यांसह अनेक नागरिकांनी सहभाग घेत मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. आपल्या हाताने बनवलेली मूर्ती घरात विराजमान करण्याची संधी मिळाल्याने गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरला आहे.