Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केसांची होईल झपाट्याने वाढ! सकाळी उठल्यानंतर करा आवळ्याच्या रसाचे सेवन, गुडघ्यापर्यंत होतील लांबलचक केस

केसांच्या वाढीसाठी नियमित आवळ्याच्या रसाचे सेवन करावे. यामध्ये असलेले विटामिन सी संपूर्ण शरीरासाठी प्रभावी ठरते. चला तर जाणून घेऊया आवळ्याचा रस बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 10, 2025 | 09:53 AM
केसांची होईल झपाट्याने वाढ! सकाळी उठल्यानंतर करा आवळ्याच्या रसाचे सेवन

केसांची होईल झपाट्याने वाढ! सकाळी उठल्यानंतर करा आवळ्याच्या रसाचे सेवन

Follow Us
Follow Us:
  • केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत?
  • आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे?
  • आवळ्याचा रस बनवण्याची सोपी कृती? 
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर आवळे येतात. तुरट चवीचे आवळे सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. आवळ्यांपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. विटामिन सी युक्त आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीर, त्वचा आणि केसांना अनेक फायदे होतात. याशिवाय सकाळी उठल्यानंतर आवळ्याचा रस नियमित प्यायल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि पचनक्रिया सुधारेल. वातावरण, आहारात होणारे बदल आणि चुकीच्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. याशिवाय हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यानंतर संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम दिसून येतात. बऱ्याचदा चुकीच्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केस अतिशय कोरडे आणि निस्तेज होऊन जातात. याशिवाय केसांमधील पोषण कमी झाल्यानंतर केसांना हानी पोहचते.(फोटो सौजन्य – istock)

घामाची दुर्गंधी होईल कायमची दूर! अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस नियमित करते ‘या’ ड्रिंकचे सेवन, कायम राहाल फ्रेश

आवळा खाल्यामुळे केसांच्या मुळांना भरपूर पोषण मिळते. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट, कर्करोग-विरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्म आढळून येतात. शक्तिशाली फळांच्या यादीमध्ये आवळ्याचे नाव कायमच घेतले जाते. आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन केल्यास रक्तात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल बाहेर पडून जाते. आज आम्ही तुम्हाला केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आवळ्याचा वापर कसा करावा, माहिती सांगणार आहोत. आवळ्याच्या सेवनामुळे केसांची गुणवत्ता सुधारून केसांच्या मुळांना भरपूर पोषण मिळेल आणि केसांची झपाट्याने वाढ होईल.

आवळ्याचा या पद्धतीने करा वापर:

आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामीन सी आढळून येते. आवळा केस आणि त्वचेसाठी अत्यंत प्रभावी आहे. आवळा स्वच्छ धुवून बारीक तुकडा करा. मिक्सरच्या भांड्यात बारीक चिरून घेतलेला आवळा, काळीमिरी, कढीपत्त्याची पाने, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक वाटून घ्या. वाटून घेतलेला रस गाळून त्यात थोडस पाणी घालून नियमित सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील आणि आरोग्य सुधारेल. तसेच तयार केलेले मिश्रण गाळून बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा. कोमट पाण्यात नियमित एकआईस क्यूब टाकून सेवन केल्यास शरीर कायमच निरोगी राहील आणि शरीरातील घाण बाहेर पडून जाईल.

यामी गौतमी नितळदार आणि सुंदर त्वचेसाठी फॉलो करते आजीने सांगितलेला पारंपरिक घरगुती उपाय! ब्यूटी ट्रिटमेंट्स जाल विसरून

आवळ्याचा रस नियमित प्यायल्यास हार्मोन्स संतुलित राहतील. आवळ्यामध्ये असलेल्या फायबरमुळे शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी राहते. बद्धकोष्ठता, गॅस आणि ऍसिडिटीसारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आवळ्याच्या रसाचे सेवन करावे. याशिवाय रक्तात साचून राहिलेले विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी इतर कोणत्याही पेयांचे सेवन करण्याऐवजी आवळ्याच्या रसाचे सेवन करावे. यामुळे रक्त शुद्ध होऊन त्वचेची गुणवत्ता सुधारेल.

Web Title: Hair will grow faster consume amla juice after waking up in the morning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 09:53 AM

Topics:  

  • amla benefits
  • amla for hair
  • hair care tips

संबंधित बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आवळा खाण्याचा सल्ला! शक्तिशाली घटकांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास राहाल कायम निरोगी
1

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आवळा खाण्याचा सल्ला! शक्तिशाली घटकांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास राहाल कायम निरोगी

Hair Care: पांढऱ्या केसांसाठी कायमच केमिकल हेअर डायचा वापर करता? केसांना लावा ‘या’ हिरव्या पानांचा रस, केस होतील काळेभोर
2

Hair Care: पांढऱ्या केसांसाठी कायमच केमिकल हेअर डायचा वापर करता? केसांना लावा ‘या’ हिरव्या पानांचा रस, केस होतील काळेभोर

Hair Care: केसांना मिळेल पोषण अन् चमकही! अंड्यात ‘या’ गोष्टी मिसळून बनवा हेअर मास्क; जाणून घ्या पद्धत
3

Hair Care: केसांना मिळेल पोषण अन् चमकही! अंड्यात ‘या’ गोष्टी मिसळून बनवा हेअर मास्क; जाणून घ्या पद्धत

Hair Fall: शॅम्पूमुळे केस गळतात का? केसांच्या आरोग्यासाठी जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी
4

Hair Fall: शॅम्पूमुळे केस गळतात का? केसांच्या आरोग्यासाठी जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.