जो रूटने मोडला पीटरसनचा विक्रम(फोटो-सोशल मीडिया)
Joe Root’s historic feat : इंग्लंड सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. येथे या दोन देशांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा ५ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात इंग्लंड संघातील अनुभवी फलंदाज जो रूटने आणखी एक ऐतिहासिक कामगिरी करत नवा कीर्तिमान प्रस्थापित केला आहे. श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात शानदार अष्टपैलू खेळ करत रूटने ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार पटकावला आणि या बाबतीत इंग्लंडचा माजी स्टार केविन पीटरसनचा विक्रम मोडीत काढला. या सामन्यातील विजयासह इंग्लंडने वनडे मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ २१९ धावांवर आटोपला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला, तर जो रूटनेही गोलंदाजी करतदोन महत्त्वाचे बळी घेतले.
हेही वाचा : T20 World Cup 2026 आधी या खेळाडूवर कोसळला दु:खाचा डोंगर! वडिलांचे झाले निधन
लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या जो रूटने डाव सावरत संयमी आणि प्रभावी खेळी केली. त्यांनी ९० चेंडूंमध्ये ७५ धावांची अर्धशतकी खेळी केली, ज्यात पाच चौकारांचा समावेश होता. बेन डकेटसोबतची त्यांची भागीदारी निर्णायक ठरली, तर नंतर हॅरी ब्रूकसोबत त्यांनी विजयाची पायाभरणी केली. या कामगिरीसाठी जो रूटला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात काल गुवाहाटी येथे तिसरा टी-२० सामना खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने दिलेले १५४ धावांचे लक्ष्य भारताने १० षटकातच २ गडी गमावून पूर्ण केले. भारताने सलग ३ सामने जिंकत भारताने ही मालिका खिशात घातली आहे. अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या झंझावाती खेळीपुढे न्यूझीलंडचा टिकाव लागू शकला नाही. अभिषेकने नागपूरनंतर पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या तोंडचे पाणी पळवले असल्याचे दिसून आले. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव फॉर्मात आयाला असून त्याने या सामन्यात २६ चेंडूत नाबाद ५७ धावा केल्या तर अभिषेक शर्माने २० चेंडूत ६८ धावांची नाबाद खेळी केली.






