Republic Day Global Celebration : तिरंग्याच्या रंगात न्हाली दुनिया! दुबई ते न्यूझीलंड मध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन भारतीय दूतावास (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टन येथे भारतीय उच्चायुक्त नीता भूषण यांच्या हस्ते धव्जारोहण करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रगीत गायन करण्यात आले. वंदे मातरम् च्या १५० वर्षाच्या स्मरणार्थ सामूहिक गायनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
याशिवाय पापुआ न्यू गिनी, जपान, सिंगापूर, तिमोर लेस्ते यांसाह अनेक आशियाई देशांमध्ये देखील प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आळा आहे. या कार्यक्रमांमध्ये भारतीयांसह परदेशी नागरिकांनी देखील सहभाग घेतला होता.
On the proud occasion of India’s 77th Republic Day, the High Commissioner unfurled the Tiranga and read the Hon’ble President’s address to the nation, reaffirming the values of democracy, unity, and constitutional spirit.
The celebration was enriched by patriotic cultural… pic.twitter.com/sSsTxeS42I — India in Australia (@HCICanberra) January 25, 2026
तसेच ऑस्ट्रेलियाच्या उच्चायुक्तालया ऑस्ट्रेलियामध्येही भारतीय उच्चायुक्तांनी तिरंगा फडकवला आणि भारताच्या लोकशाही, एकता, संवैधानिक भावनेच्या मूल्यांच्या उल्लेखही केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा संदेश वाचण्यात आला. देशभक्तीपर गीते, सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सव अधिक समृद्ध झाला होता.
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सर्वात आकर्षण ठरले ते, नृत्य, संगीत, नाट्यप्रयोगांद्वारे सादर करण्यात आलेली भारताची संस्कृती आणि पंरपरा. Operation Sindoor वरही नृत्यनाट्याने लोकांचे विशेष लक्षे वेधून घेतले गेले. परदेशी लोकांना भारतीय संस्कृती पहायला मिळाली.
कतार आणि दुबई येथील भारतीय दूतावासांचा परिसर तिरंग्याच्या रोषणाईने सजवण्यात आला होता. केशरी, पांढरा हिरवा रंगाच्या प्रकाशाने दुबईतील इमारती उजाळून निघाल्या होत्या. हा जागतिक सोहळा भारतीयांची एकता, देशप्रेम आणि भारताच्या लोकशाही मूल्यांचा गौरव अधोरेखित करतो.
Glimpses of Cultural program @cgidubai on the occasion of the 77th Republic Day🇮🇳. https://t.co/D7R96A06Np pic.twitter.com/8GKm2f4mEv — India in Dubai (@cgidubai) January 26, 2026






