भिजवलेले बदाम उपाशीपोटी खाण्याचे 6 फायदे
बाजारात अनेक प्रकारचे नट्स अर्थात ड्रायफ्रुट्स उपलब्ध आहेत. पण इतर ड्रायफ्रूट्सच्या तुलनेत भिजवलेल्या बदामात जास्त शक्ती असते. दररोज फक्त 6 बदाम तुम्हाला फायबर, प्रथिने, मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन ई, फायटोस्टेरॉल्स, फिनोलिक ॲसिड आणि इतर अनेक पोषक द्रव्ये देऊ शकतात.
वास्तविक, आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, आपण दररोज जे अन्न खातो ते आपल्या शरीरातील पोषक तत्वांच्या गरजा पूर्ण करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांनी ड्रायफ्रूट्सचा नित्यक्रमात समावेश करण्याची शिफारस केली आहे. विशेषतः बदाम हे सर्वात फायदेशीर असल्याचे सांगण्यात आले आहे. आयुर्वेदिक डॉ. माधव भागवत सांगतात की, लहान असो वा वृद्ध, रोज सकाळी 6 भिजवलेले बदाम खायला सुरुवात करा, त्याचे फायदे पाहून तुम्हीही म्हणाल बदाम हे औषधापेक्षा कमी नाही. (फोटो सौजन्य – iStock)
हृदयविकाराचा धोका कमी होतो
हृदयविकाराचा धोका टळतो
बदामामध्ये प्लांट प्रोटीन असून ट्रान्स फॅट नसते, परंतु निरोगी मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते, जे खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते, ज्याला लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) म्हणतात. यासह, हे गुड कोलेस्ट्रॉल हाय-डेन्सिटी लिपोप्रोटीन (एचडीएल) चा स्तर वाढवते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
हेदेखील वाचा – 15 दिवस रोज खा भिजवलेले बदाम, शरीराचा होईल कायापालट मिळतील फायदे
तीक्ष्ण मेंदूसाठी
मेंदूला मिळतो फायदा
बदामाला ब्रेन फूड असेही म्हणतात. भिजवलेल्या बदामात रिबोफ्लेविन आणि एल-कार्निटाइन आढळतात, जी संयुगे मेंदूसाठी अन्नासारखी काम करतात. यामुळे मानसिक शक्ती वाढून लक्षात ठेवण्याची आणि विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता सुधारते. तुम्ही रोज 6 भिजवलेले बदाम खाऊन तुमची मेंदूची शक्ती वाढवू शकता.
पोषक तत्वांच्या शोषणासाठी
मी खूप खातो, पण माझ्या शरीराला ते जाणवत नाही हे वाक्य बऱ्याचदा तुमच्या कानावर पडत असेल. वास्तविक, आपल्या शरीरात काही एन्झाइम्स असतात, जे अन्नातून पोषक तत्वे काढून शरीराला देण्याचे काम करतात. या एझाइम्सच्या कमतरतेमुळे शरीराला पोषण मिळत नाही. भिजवलेले बदाम या एन्झाइमची कमतरता भरून काढतात. रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाल्ल्याने एन्झाइम बाहेर पडतात आणि व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांसारख्या पोषक तत्वांचे शोषण वाढते, ज्यामुळे स्नायू आणि हाडे दोन्ही मजबूत राहतात.
हेदेखील वाचा – बदाम हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही वरदान
वजन नियंत्रणात राहते
वजन आटोक्यात राहण्यासाठी
6 भिजवलेले बदाम तुम्ही सकाळी उपाशीपोटी नियमित खाल्ल्यानंतर तुम्हाला वारंवार भूक लागणार नाही. तुम्हाला बराच काळ पोट भरलेले वाटेल. अशा परिस्थितीत ते वजन नियंत्रित करण्यास मदत करते. कारण यामुळे कॅलरीजचे सेवन कमी होते.
मधुमेहासाठी फायदेशीर
मधुमेहाचा धोका कमी होण्यासाठी
भिजवलेले बदाम मधुमेह असलेल्यांसाठीही फायदेशीर आहेत. कारण भिजवलेल्या बदामात कार्बोहायड्रेटची पातळी कमी आणि प्रथिने, फायबर आणि मॅग्नेशियम जास्त असते. ते रक्तातील साखरेची पातळी वाढू देत नाही, त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
उत्तम पचनक्रियेसाठी
पचनक्रिया चांगली होते
बदामामध्ये फायटिक ॲसिड असते. हे ॲसिड अन्न पचण्यास आणि खनिजे शोषण्यास मदत करते. त्यामुळे सकाळी भिजवलेले बदाम खाल्ल्यास पचनाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत. विशेषत: जर तुम्हाला गॅस आणि पोटात सूज येत असेल तर तुम्ही दररोज सकाळी भिजवलेले बदाम जरूर खाऊन पहा.
संदर्भ