Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Tips: ऑफिसमध्ये तासन्‌तास बसून काम? आजच फॉलो करा ‘या’ टिप्स; राहाल फिट अन् हेल्दी

Health Tips Desk Job People: ऑफिसमध्ये दीर्घकाळ बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये पाठदुखी, मानदुखी, डोळ्यांचा ताण आणि मानसिक थकवा यांसारख्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी या सोप्या हेल्थ टिप्स फॉलो करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 16, 2026 | 07:00 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • ऑफिसमध्ये दिवसभर बसून काम करता?
  • फिट राहण्यासाठी या हेल्थ टिप्स करा फॉलो
  • निरोगी सवयीच ठरतील आरोग्यदायी
आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक कर्मचारी दिवसातील आठ ते दहा तास संगणकासमोर बसून काम करतात. सतत एकाच जागी बसल्यामुळे पाठदुखी, मानदुखी, डोळ्यांचा ताण, लठ्ठपणा आणि मानसिक थकवा यांसारख्या समस्या वाढू लागतात. मात्र, दैनंदिन दिनचर्येत काही साध्या आणि आरोग्यदायी सवयींचा समावेश केल्यास या समस्यांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येते. निरोगी शरीर आणि ताजेतवाने मन कामाची कार्यक्षमता वाढवण्यासही मदत करते.

सततचा खोकला आणि श्वास घेण्यास त्रास? दुर्लक्ष करू नका; हृदयविकाराचे असू शकतात संकेत

दर 45 ते 60 मिनिटांनी खुर्चीवरून उठा

सलग तासन्‌तास बसून काम करण्याऐवजी प्रत्येक 45 ते 60 मिनिटांनी काही मिनिटे चालावे किंवा हलका स्ट्रेचिंग व्यायाम करावा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते, स्नायूंचा ताण कमी होतो आणि पाठ-मान दुखण्याचा धोका कमी होतो.

पुरेसे पाणी पिणे आवश्यक

कामाच्या भानात अनेकदा पाणी पिणे विसरले जाते. मात्र, दिवसभरात सुमारे 2.5 ते 3 लिटर पाणी पिल्यास शरीर हायड्रेट राहते, ऊर्जा टिकून राहते, पचन सुधारते आणि थकवा कमी जाणवतो.

आरोग्यदायी स्नॅक्सची निवड करा

भूक लागल्यावर चिप्स, बिस्किटे किंवा गोड पदार्थ खाण्याऐवजी फळे, ड्रायफ्रूट्स, भाजलेले चणे, मखाणे किंवा दही यांसारखे पौष्टिक पर्याय निवडा. हे पदार्थ शरीराला आवश्यक पोषण देतात आणि दीर्घकाळ पोट भरल्याची भावना निर्माण करतात.

डोळ्यांना नियमित विश्रांती द्या

सतत स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. यासाठी 20-20-20 नियम पाळा. प्रत्येक 20 मिनिटांनी 20 सेकंदांसाठी सुमारे 20 फूट अंतरावरील वस्तूकडे पाहिल्यास डोळ्यांना आराम मिळतो आणि ताण कमी होतो.

योग्य पोश्चर आणि नियमित व्यायाम करा

काम करताना पाठ सरळ ठेवून बसावे, मॉनिटर डोळ्यांच्या समांतर असावा आणि खुर्चीला पूर्ण आधार द्यावा. याशिवाय रोज किमान 30 मिनिटे चालणे, योग, स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि हृदयाचे आरोग्यही सुधारते.

पुरेशी झोप आणि तणावावर नियंत्रण

दररोज 7 ते 8 तासांची झोप घेणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. तसेच ध्यान, श्वसनाचे व्यायाम किंवा आवडत्या छंदासाठी वेळ दिल्यास तणाव कमी होतो आणि कामातील एकाग्रता वाढते.

निरोगी सवयीच ठरतील आरोग्यदायी

ऑफिसमधील व्यस्त वेळापत्रकामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. नियमित हालचाल, संतुलित आहार, पुरेसे पाणी, योग्य झोप आणि तणावमुक्त जीवनशैली या सवयी अंगीकारल्यास दीर्घकाळ निरोगी राहणे शक्य होते. छोट्या बदलांमुळे मोठे आरोग्यदायी परिणाम मिळू शकतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Cooking Tips: चपाती कडक होते? पीठ मळताना टाळा ‘या’ चुका; तासन्‌तास राहतील मऊ आणि लुसलुशीत

Web Title: Health tips for employees office health tips fit active workplace wellness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • health care news
  • Health Tips
  • office work

संबंधित बातम्या

ग्रीन टी की ब्लॅक कॉफी? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय आहे सर्वात सर्वोत्तम?
1

ग्रीन टी की ब्लॅक कॉफी? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय आहे सर्वात सर्वोत्तम?

Health Tips: डायबिटीज-बीपीचा त्रास आहे? नवरात्रीचा उपवास करताना रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?
2

Health Tips: डायबिटीज-बीपीचा त्रास आहे? नवरात्रीचा उपवास करताना रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?

Sore Throat Remedies: सर्दी-खोकल्याने घसा दुखतोय, बोलणंही कठीण झालंय? घरच्या घरी करा ‘हे’ सोपे उपाय
3

Sore Throat Remedies: सर्दी-खोकल्याने घसा दुखतोय, बोलणंही कठीण झालंय? घरच्या घरी करा ‘हे’ सोपे उपाय

Weight Loss Tips: सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने खरंच लवकर फॅट बर्न होते? जाणून घ्या सत्य
4

Weight Loss Tips: सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने खरंच लवकर फॅट बर्न होते? जाणून घ्या सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.