Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अहो आश्चर्यम्! जगातील ‘असं’ एकमेव फळ, वजन वाढविण्यास आणि Weight Loss दोन्हीसाठी होतो उपयोग

एक असे फळ आहे जे लोक वजन कमी करण्यासाठी आणि वजन वाढवण्यासाठी दोन्हीसाठी खातात. काही जण त्यांना वजन कमी करण्यासाठी प्रभावी मानतात, तर काही जण त्यांना वजन वाढवण्यासाठी एक सुपरफूड मानतात.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 26, 2026 | 10:30 AM
एकमेव फळ ज्याने वजन वाढते आणि कमीदेखील होते (फोटो सौजन्य - iStock)

एकमेव फळ ज्याने वजन वाढते आणि कमीदेखील होते (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • एकच फळ आणि दोन्ही फायदे
  • वजन वाढविण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठीही खाऊ शकता
  • काय सांगतात तज्ज्ञ 
केळी हे सर्वाधिक खाल्ले जाणारे फळ आहे. पिकलेली केळी लोकप्रिय आहेत, तर कच्ची केळी देखील विविध प्रकारे खाल्ली जातात. केळीची भाजी म्हणूनही वापर केला जातो आणि अनेक गोड पदार्थांमध्येही तिचा उपयोग होतो. हिरव्या सालीची, पिवळ्या सालीची, वेलची केळी अशी विविध केळी सर्वांनाच केळी आवडतात. ती सहज उपलब्ध, स्वस्त आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. ती आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. 

अनेक लोक वजन वाढवण्यासाठी केळी खातात, तर काही जण वजन कमी करण्यासाठी ती पसंत करतात. हे एकमेव फळ आहे जे वजन वाढवू आणि कमी करू शकते. बहुतेक लोकांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न हा असतो की केळी खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते. चला, आज आपण आहारतज्ज्ञाकडून सत्य जाणून घेऊया.

‘या’ लोकांनी चुकूनही केळी खाऊ नये, जाणून घ्या

काय सांगतात तज्ज्ञ 

नोएडा येथील ‘डाएट मंत्रा क्लिनिक’च्या संस्थापक आणि आहारतज्ज्ञ कामिनी सिन्हा यांनी एका हिंदी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, केळी वजन वाढवण्यासाठी खाल्ली जातात आणि वजन कमी करण्यासही मदत करू शकतात. याचे उत्तर तुम्ही केळी किती प्रमाणात, कोणत्या वेळी आणि कोणत्या पद्धतीने खाता यावर अवलंबून आहे. केळ्यांमध्ये चांगल्या प्रमाणात कर्बोदके आणि नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे त्वरित ऊर्जा मिळते. एका मध्यम आकाराच्या केळीमध्ये अंदाजे १०० ते १२० कॅलरीज असतात. जर एखादी व्यक्ती दिवसभरात गरजेपेक्षा जास्त कॅलरीज घेत असेल आणि शारीरिक हालचाल कमी करत असेल, तर केळी खाल्ल्याने वजन वाढू शकते.

वजन कमी करण्यासही उत्तम 

आहारतज्ज्ञांच्या मते, केळी वजन कमी करण्यासदेखील मदत करू शकतात. त्यामध्ये चांगल्या प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते. यामुळे भूक कमी होते आणि अति खाणे टाळता येते. तळलेले पदार्थ किंवा उच्च-कॅलरीयुक्त स्नॅक्सऐवजी केळी खाल्ल्याने कॅलरीची संख्या कमी होऊ शकते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. म्हणूनच वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना मर्यादित प्रमाणात केळी खाण्याचा सल्ला दिला जातो.

40 दिवस रोज खा पिकलेले केळं, मुळापासून उपटून टाकेल 3 समस्या; डॉक्टरांनी सांगितली खाण्याची योग्य पद्धत

केळी आणि दुधाचे मिश्रण वजन वाढविण्यासाठी चांगले 

तज्ज्ञांच्या मते, जे लोक जिममध्ये जातात ते वजन आणि स्नायू वाढवण्यासाठी त्यांच्या आहारात केळ्यांचा समावेश करतात. वजन वाढवण्यासाठी केळी आणि दुधाचे मिश्रण विशेषतः लोकप्रिय आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक नाश्त्यामध्ये केळी खातात. केळी, नाश्त्यामध्ये किंवा व्यायामापूर्वी खाल्ल्यास त्वरित ऊर्जा देतात. व्यायामानंतर केळी खाल्ल्याने लवकर बरे होण्यास मदत होते. तथापि, रात्री जास्त केळी खाल्ल्याने काही लोकांना पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. बहुतेक निरोगी व्यक्तींसाठी दिवसातून एक ते दोन केळी खाणे फायदेशीर आहे.

काय आहे खरा फरक 

आहारतज्ज्ञ कामिनी यांच्या मते, केवळ केळ्यांमुळे जादूने वजन वाढत नाही किंवा झपाट्याने कमीही होत नाही. खरा फरक तुमच्या एकूण आहारात, जीवनशैलीत आणि शारीरिक हालचालींमध्ये असतो. जर माफक प्रमाणात आणि योग्य आहार योजनेसह सेवन केले, तर केळी हे एक आरोग्यदायी फळ ठरू शकते, जे शरीराला आवश्यक पोषण, ऊर्जा आणि फायबर पुरवते. केळ्यांबद्दलच्या गैरसमजांवर अवलंबून राहण्याऐवजी, आपल्या आहारावर आणि जीवनशैलीवर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे.

Web Title: Health updates experts revealed the truth does banana eating causes weight gain or weight loss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • banana benefits
  • Health Tips
  • weight gain
  • Weight loss

संबंधित बातम्या

लहान वयात का वाढते लठ्ठपणाची समस्या! वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० बालरुग्णांची नोंद, पालकांसाठी चिंतेचा विषय
1

लहान वयात का वाढते लठ्ठपणाची समस्या! वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० बालरुग्णांची नोंद, पालकांसाठी चिंतेचा विषय

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात
2

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात

Beauty Tips : चेहऱ्यावर केळीची साल घासल्याने काय होते? अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने सांगितले फायदे
3

Beauty Tips : चेहऱ्यावर केळीची साल घासल्याने काय होते? अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने सांगितले फायदे

ग्रीन टी की ब्लॅक कॉफी? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय आहे सर्वात सर्वोत्तम?
4

ग्रीन टी की ब्लॅक कॉफी? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय आहे सर्वात सर्वोत्तम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.