प्रत्येक स्वयंपाक घरात तूप हे असतंच. गाईच्या दुधापासून बनवलेले तूप आरोग्यासाठी गुणकारी आहे. जेवणातील प्रत्येक पदार्थ बनवताना तूपाचा वापर केला जातो. गोड पदार्थ, डाळ, चपाती इत्यादी सर्व पदार्थाने तूप लावले जाते. तूपासून बनवलेले पदार्थ खाल्याने पचनाचा त्रास जाणवत नाही. तूप पचायला हलके असल्याने अनेक घरांमध्ये तूपापासून बनवलेले पदार्थ खाल्ले जातात. तूपाचे सेवन केल्याने त्वचा हायड्रेट राहून त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. नियमित तूपाचे सेवन केल्याने त्वचा मऊ आणि चमकदार दिसते. पण तुम्ही कधी कोमट पाण्यात तूप टाकून खाल्ले आहे का? यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? चला तर जाणून घेऊया.
सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात एक चमचा गाईचे तूप टाकून प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. तसेच त्वचेच्या आरोग्यासाठी तूप गुणकारी आहे. तूपामुळे शरीर मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या संतुलित राहते. चला तर जाणून घेऊया गाईचे तूप कोमट पाण्यात टाकून प्यायल्यास शरीराला नेमके काय फायदे होतात.(फोटो सौजन्य – iStock)
रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते:
सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा तूप टाकून प्यायल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते. गाईच्या तुपात ए, डी आणि ई जीवनसत्त्वे आढळून येतात, ज्यामुळे आपल्या शरीराला फायदे होतात. रोग प्रतिकारशक्ती मजबूत झाल्याने आजारांपासून शरीराचे होणारे नुकसान टाळता येते.
[read_also content=”लहान मुलांना लिंबू पाणी द्यावे की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांकडून फायदे आणि तोटे https://www.navarashtra.com/lifestyle/benefits-and-side-effects-of-lemon-water-545670.html”]
त्वचा सुधारते:
गाईच्या तूपामध्ये पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात, जे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि त्वचेवरील चमक कायम टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. त्वचेचा पोत सुधारून त्वचा सुंदर दिसते.
चिंता तणाव दूर होतो:
नैसर्गिक पद्धतींचा वापर करून बनवलेल्या गाईच्या तूपात अँटिऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे तणाव कमी होऊन मानसिक आरोग्य सुधारते. तसेच मेंदूचे कार्य चांगले राहते.
[read_also content=”शरीराला द्या बर्फासारखा थंडावा, घरी बनवा सोप्या पद्धतीमध्ये वेलचीचे सरबत https://www.navarashtra.com/lifestyle/make-cardamom-juice-at-home-in-easy-way-545647.html”]
पचनक्रिया सुधारते:
गाईच्या तूपामध्ये ब्युटीरिक ऍसिड आढळून येते, ज्यामुळे आतड्यांमध्ये आढळणारे चांगले बॅक्टेरिया शरीरात टिकून राहतात. पोटातील जळजळ कमी होऊन पचनशक्ती निरोगी राहते. एक ग्लास कोमट पाण्यात १ चमचा तूप टाकून प्यायल्यास शरीरातील ऊर्जा वाढते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.






