Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 20 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Heat Control Tips : स्वयंपाकघरातील हे 5 मसाले शरीराला ठेवतील थंड, जाणून घ्या रोजच्या जीवनात कसा करावा वापर…

Cooling Spices : तुम्हाला माहिती आहे का? आपल्या स्वयंपाकघरात काही असे मसाले आहेत जे फक्त जेवणाची चवच वाढवत नाही तर शरीराला थंडावाही मिळवून देतात. उन्हाळ्यात याचे सेवन आपल्या शरीरासाठी भरपूर फायद्याचे ठरु शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 22, 2026 | 08:15 PM
Heat Control Tips : स्वयंपाकघरातील हे 5 मसाले शरीराला ठेवतील थंड, जाणून घ्या रोजच्या जीवनात कसा करावा वापर...

Heat Control Tips : स्वयंपाकघरातील हे 5 मसाले शरीराला ठेवतील थंड, जाणून घ्या रोजच्या जीवनात कसा करावा वापर...

Follow Us
Follow Us:
  • उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी ठेवण्यासाठी आहारात काही खास घटकांचा समावेश महत्त्वाचा ठरतो.
  • स्वयंपाकघरातील काही पदार्थ पचन सुधारण्यासोबत शरीराला आतून थंडावा देतात.
  • योग्य पद्धतीने वापर केल्यास हे घटक उष्माघात आणि डिहायड्रेशनपासून बचाव करण्यात मदत करतात.
उन्हाळा ऋतू सुरु झाला असून उष्णतेच्या लाटा आता जाणवू लागल्या आहेत. उन्हाळ्यात वातावरण इतके तापते की याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते. उन्हाळ्याच्या या कडक तापमानात आपण जर आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेतली नाही तर डिहायड्रेशन, उष्माघात, त्वचेच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. याकाळात स्वत:ला जर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवायचे असेल तर आपल्या आहारात थंड पदार्थांचा समावेश करणं फार गरजेचं ठरतं. आता हे थंड पदार्थ शोधण्यासाठी आपण नेहमी घराबाहेरचा मार्ग निवडतो पण तुम्हाला ठाऊक आहे का? घराबाहेरील पदार्थच नाही तर स्वयंपाकघरात आढळून येणारे काही मसाले देखील आपल्या शरीराला आतून थंडावा मिळवून देण्यास मदत करतात. या मसाल्यांचा आपल्या आहारात समावेश करुन तुम्ही शरीरात उष्णतेचा प्रभाव कमी करु शकता. चला तर मग ते कोणते मसाले आहेत याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

प्रत्येक भाजीत वापरला जाणारा ‘कांदा’ पंतप्रधान मोदीसुद्धा आवडीने खातात…, याचे फायदे, तोटे माहिती आहेत का?

सुकी पुदिना पावडर

पोषणतज्ञांच्या मते, उन्हाळ्यात शरीराला थंडाव्या गरज असते. सुक्या पुदिन्याच्या पावडर यासाठी एक प्रभावी उपाय मानला जातो. त्यात मेन्थॉल, अँटीऑक्सिडंट्स, लोह आणि व्हिटॅमिन ए असतात, जे पचनक्रिया सुधारतात आणि शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात. याच्या सेवनाने पोटातील जळजळ, गॅस आणि उलट्यांसारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. तुम्ही ही पावडर घरीच तयार करुन एका डब्यात साठवू शकता. तिला ताक, ज्यूस, दही किंवा लिंबू सरबतामध्ये मिक्स करुन याचे सेवन करता येऊ शकते.

सुकी धणेपूड

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात सुकी धणेपूड ठेवलेली असतेच. याचे सेवन शरीराला थंडावा मिळवून देते ज्यामुळे उन्हाळ्यात तर तुम्ही अधिकाधिक पदार्थांमध्ये याचा समावेश करायला हवा. यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे पचनक्रिया सुधारतात आणि शरीरातील पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) कमी करण्यास मदत करतात. उन्हाळ्यात तुम्ही धणे रात्रभर भिजवून सकाळी त्याच्या पाण्याचे सेवन करु शकता.

जिऱ्याचे दाणे

रोजच्या जेवणात जिऱ्याचा अधिकतर वापर केला जातो. जेवणात वापरले जाणारे हे जिरे फक्त जेवणाची चवच वाढवत नाही तर शरीराचे तापमान देखील संतुलित ठेवण्यास मदत करते. यात लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे पचनसंस्था मजबूत करतात. उन्हाळ्यात पाण्यात जिरे टाकून ते उकळवून आणि मग पाणी थंड करुन तुम्ही याचे सेवन करु शकता. याशिवाय ताक किंवा दह्यात टाकूनही जिऱ्याचे सेवन करता येऊ शकते.

बडीशेपच्या बिया

जेवणानंतर बडिशेपचे सेवन केले जाते. याशिवाय आपण अनेक पदार्थांमध्येही याचा वापर करु शकतो. बडिशेपमध्ये फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला थंडावा देण्यासोबतच पचनक्रियाही सुधारण्यासही आपली मदत करतात. उन्हाळ्यात बडिशेपला चावून तुम्ही याचे सेवन करु शकताय याव्यतिरिक्त बडिशेपला पाण्यात मिळून तुम्ही याचे पाणी देखील पिऊ शकता. तुम्ही सरबत किंवा हर्बल टीमध्येही याचा वापर करु शकता.

१५ मिनिटांत चेहऱ्यावर येईल पार्लरसारखा इंस्टंट ग्लो! ‘या’ पद्धतीने करा मसूर डाळीचा वापर, डेड स्किन होईल गायब

वेलची

वेलचीमधील नैसर्गिक गुणधर्म शरीराला आतून थंडावा मिळवून देण्यास मदत करतात. यातील अँटीऑक्सिडंट्स, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. उन्हाळ्यात तुम्ही वेलची पाण्यात मिसळून किंवा दुधात उकळवून याचे सेवन करु शकता. चहातही किंवा गोडाच्या पदार्थांमध्येही याचा वापर केला जातो. यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते आणि शरीराला ताजेतवाने वाटू लागते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Heat control tips 5 kitchen spices that keep your body cool lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • food
  • lifestyle news
  • summer care tips
  • summer heat

संबंधित बातम्या

Bhiwandi News : अरे बापरे! शोरमा-पिझ्झा खाल्ल्याने १०७ जणांना अन्न विषबाधा; ३६ तासांनंतर नेत्यांची रुग्णालय भेट
1

Bhiwandi News : अरे बापरे! शोरमा-पिझ्झा खाल्ल्याने १०७ जणांना अन्न विषबाधा; ३६ तासांनंतर नेत्यांची रुग्णालय भेट

Thecha Pulav: रोजच्या भाताला द्या हटके ट्विस्ट; बनवा झणझणीत ठेचा पुलाव, फक्त २० मिनिटांत तयार, रेसिपी नोट करा
2

Thecha Pulav: रोजच्या भाताला द्या हटके ट्विस्ट; बनवा झणझणीत ठेचा पुलाव, फक्त २० मिनिटांत तयार, रेसिपी नोट करा

Fathers Day 2026 : फादर्स डे कसा साजरा कराल? वडिलांना खास वाटण्यासाठी या 10 अर्थपूर्ण गोष्टी करा
3

Fathers Day 2026 : फादर्स डे कसा साजरा कराल? वडिलांना खास वाटण्यासाठी या 10 अर्थपूर्ण गोष्टी करा

जोडीदाराच्या आयुष्यात पहिलं स्थान हवंय? मग नात्यात करू नका ‘या’ 3 चुका
4

जोडीदाराच्या आयुष्यात पहिलं स्थान हवंय? मग नात्यात करू नका ‘या’ 3 चुका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.