उन्हाळ्यात किडनी निरोगी ठेवणे हे मोठे आव्हान असते. विशेषत: त्या लोकांसाठी जे उच्च तापमान असलेल्या ठिकाणी राहतात. नॅशनल किडनी फाऊंडेशनच्या मते, 40 डिग्री सेल्सिअस तापमान आणि 70 टक्के आर्द्रतेमध्ये राहिल्याने किडनीला धोका निर्माण होतो. कारण प्रत्येकाच्या शरीराला आवश्यकतेनुसार घाम येतोच असे नाही.
या लेखातून आम्ही तुम्हाला याबाबत अधिक माहिती देत आहोत की, किडनी शरीरातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करण्याचे काम करते. अशा परिस्थितीत शरीरात पाण्याची कमतरता असल्यास किडनीवर जास्त दबाव येतो. अशा परिस्थितीत, मूत्रपिंड निकामी होणे किंवा नुकसान टाळण्यासाठी लक्षणे दिसण्यापूर्वीच उपाययोजना करणे शहाणपणाचे आहे. या लेखात तुम्हाला किडनी निरोगी ठेवण्याच्या सोप्या मार्गांबद्दल तपशीलवार माहिती मिळेल. (फोटो सौजन्य – iStock)
किडनी खराब होण्याची सुरूवातीची लक्षणे
स्वत:ला हायड्रेटेड ठेवा
मुत्रपिंडाच्या आरोग्यासाठी पुरेसे पाणी पिणे सर्वात गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. खरं तर, उन्हाळ्यात जास्त घाम येतो, त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते. अशा स्थितीत शरीरात घाण आणि ॲसिड जमा होण्यास सुरुवात होते जी किडनी ब्लॉक करण्याचे काम करते. म्हणून, दर दोन तासांनी एक ग्लास पाणी पिण्याव्यतिरिक्त, आपल्या आहारात अधिक पाणीयुक्त भाज्या आणि फळांचा समावेश करा.
[read_also content=”वाढत्या उष्णतेमुळे मुतखड्यांच्या प्रकरणात वाढ https://www.navarashtra.com/lifestyle/kidney-stone-cases-increasing-due-to-rising-temperature-experts-worried-about-the-same-538034/”]
मीठ-साखरेचे सेवन कमी
जास्त प्रमाणात मीठ आणि साखर खाल्ल्याने किडनी खराब होते. त्यामुळे जेवणात मीठ आणि साखरेचे प्रमाण कमी करा. पॅकेज्ड फूड आणि प्रोसेस्ड फूड टाळा, कारण त्यामध्ये या दोन्ही गोष्टींचे प्रमाण जास्त असते. घरगुती जेवणात मीठ आणि साखरेचा कमीत कमी वापर करा.
वजन नियंत्रित ठेवा
किडनीच्या आजारासाठी लठ्ठपणा हा एक प्रमुख जोखीम घटक आहे. म्हणून, किडनीच्या आरोग्यासाठी निरोगी वजन राखणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत पौष्टिक आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा. तुमचे वजन वाढले असेल तर वेळीच ते कमी करण्याचा प्रयत्न करा.
[read_also content=”शरीरात बसवली डुकराची किडनी, तरूणाचा झाला मृत्यू https://www.navarashtra.com/world/a-patient-who-had-a-pig-kidney-implanted-in-his-body-died-the-surgery-was-done-two-months-agonrsk-532724/”]
धूम्रपान आणि मद्यपान टाळा
धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन मूत्रपिंडांना अर्थात किडनीला हानी पोहोचवू शकते. म्हणून, जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर ते सोडण्याचा प्रयत्न करा आणि अल्कोहोलचे सेवन कमी करा. अधिकाधिक स्वतःला जपण्याचा प्रयत्न करा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.