
वजन- अपचनाचा त्रास कायमचा होईल कमी! सकाळी उठल्यानंतर न चुकता करा 'या' पेयाचे सेवन, पारंपरिक उपायांनी करा दिवसाची सुरुवात
वजन कमी करण्यासाठी उपाय?
जिरे-धणे-बडीशेपचे गुणकारी फायदे?
अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी काय करावे?
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, वारंवार पॅक बंद आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे अतिसेवन, जंक फूड, अपुरी झोप आणि कमी पाण्याच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. वारंवार तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि आतड्यांमध्ये विषारी घाण साचून राहते. आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घाणीमुळे आंबट ढेकर येणे, अपचन तर काहीवेळा उलट्या, मळमळ होण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात कमीत कमी प्रमाणात तिखट, तेलकट आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे सेवन करावे. बऱ्याचदा वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी महागडे डाएट किंवा सप्लिमेंट्स घेतले जातात. पण या सप्लिमेंट्समुळे भविष्यात किडनी आणि शरीराच्या इतर अवयवांना हानी पोहचू शकते.(फोटो सौजन्य – istock)
‘An Apple a Day’ फक्त म्हण नाही! सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यास मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे
शरीरावर वाढलेला चरबीचा थर कमी करण्यासाठी तासनतास जिम तर काहीवेळा अन्नपदार्थांचे सेवन करणे बंद केले जाते. सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचे जेवण न जेवता काही लोक उपाशी झोपून जातात. चुकीचा डाएट फॉलो केल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी शरीरात थकवा, अशक्तपणा वाढू शकतो. त्यामुळे वाढलेले वजन आणि बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी नियमित या पेयाचे सेवन करावे. या पेयाच्या सेवनामुळे पोटावर जमा झालेला चरबीचा थर झपाट्याने कमी होईल आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतील.
पोट फुगणे, पोटात जडपणा, गॅस होणे तर वजन कमी करण्यासाठी वारंवार सप्लिमेंट्स किंवा गोळ्या घेण्याऐवजी घरगुती आणि पारंपरिक उपाय करून शरीराची काळजी घ्यावी. घरगुती उपाय केल्यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी जिरे, धणे आणि बडीशेप हे पदार्थ अतिशय फायदेशीर मानले जातात. पूर्वीच्या काळापासून दैनंदिन वापरात जिरे, धणे आणि बडीशेपचा वापर केला जातो. यामुळे जेवणाची चव सुधारते आणि खाल्लेले अन्नपदार्थ पचन होण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर नियमित या तीन पदार्थांचे पाणी बनवून प्यायल्यास महिनाभरात शरीर स्वच्छ होण्यासोबतच पचनक्रिया सुद्धा चांगली राहील.
पारंपरिक पेय बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात एक ग्लास पाणी घेऊन त्यात जिरे, धणे आणि बडीशेप घालून पाणी उकळण्यासाठी ठेवा. टोपातील पाणी अर्धा झाल्यानंतर गॅस बंद करून पाणी घालून घ्या आणि पाण्यात मध टाकून सेवन करा. उपाशी पोटी नियमित न चुकता गुणकारी पेय प्यायल्यास वाढलेले वजन कमी होण्यासोबतच शरीर आतून स्वच्छ होईल आणि आरोग्य कायमच निरोगी राहील.
जिऱ्यामध्ये असलेले पोषक घटक अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळवून देतात. तर जेवणानंतर नियमित चिमूटभर बडीशेप खाल्ल्यास अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होईल. जुनाट बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका हवी असल्यास जिरे-धणे-बडीशेपचे पाणी बनवून प्यावे. यामुळे पोटात वाढलेला जडपणा कमी होण्यासोबतच खूप हलके वाटेल. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी जिरे-धणे-बडीशेपपासून बनवलेल्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ राहते आणि शरीर आतून स्वच्छ राहण्यास मदत होते.
Ans: सकाळी कोमट पाणी, जिऱ्याचे पाणी, लिंबू पाणी किंवा इतर नैसर्गिक पेये काही लोकांना पचन सुधारण्यास मदत करू शकतात.
Ans: फक्त एखादे पेय घेतल्याने वजन कमी होत नाही. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य जीवनशैलीसोबत अशा सवयी उपयुक्त ठरू शकतात.
Ans: सकाळी हायड्रेशन, पौष्टिक नाश्ता, व्यायाम आणि दिवसभर संतुलित आहार घेण्याची सवय ठेवणे महत्त्वाचे आहे.