Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहरा कोरडा आणि निस्तेज झाला आहे? मग घरगुती पदार्थांचा वापर करून बनवा होममेड फेसपॅक, त्वचा होईल तरुण

त्वचा कोरडी झाल्यानंतर निस्तेज दिसू लागते. ज्यामुळे काहीवेळा मेकअप केल्यानंतर तो अधिक काळ टिकत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी फेसपॅक बनवण्याची कृती सांगणार आहोत. जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 22, 2025 | 11:40 AM
कोरड्या त्वचेसाठी घरगुती फेसपॅक

कोरड्या त्वचेसाठी घरगुती फेसपॅक

Follow Us
Follow Us:

त्वचेमधील सतत होणाऱ्या बदलांमुळे त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर चेहऱ्यावर अनेक बदल दिसून येतात. प्रदूषण, ऊन, पिंपल्स, सुरकुत्या, कोरडी त्वचा इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. त्वचा खराब झाल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या क्रीम, फेसमास्क, फेसपॅक आणून लावतात. मात्र यामुळे त्वचेवर काहीसा परिणाम दिसून येतो. त्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी केमिकल उपाय करण्यापेक्षा घरगुती उपाय करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोरडी त्वचा सुधारण्यासाठी घरगुती फेसपॅक तयार करण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हे उपाय नियमित केल्यास कोरड्या त्वचेपासून सुटका होईल.(फोटो सौजन्य – iStock)

Skin Tips :डार्क स्पॉटमुळे खराब झालेला चेहरा उजळ्वण्यासाठी लिंबाच्या रसात मिक्स करा ‘हे’ प्रभावी पदार्थ, त्वचा होईल सुंदर

कोरड्या त्वचेसाठी घरगुती फेसपॅक:

चंदन फेसपॅक:

त्वचा कोरडी आणि निस्तेज झाल्यानंतर चंदन फेसपॅक तयार करून त्वचेवर लावावा. यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि उठावदार दिसते. यासाठी वाटीमध्ये चंदन पावडर घेऊन त्यात कडुलिंबाच्या पानांची पावडर घालून मिक्स करा. नंतर त्यात कोरडफचा रस टाकून मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवून नंतर काहीवेळाने त्वचेवर लावून घ्या. चेहऱ्यावर लावले मिश्रण सुकल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या कमी होतील.

दही फेसपॅक:

फेसपॅक तयार करण्यासाठी वाटीमध्ये दही घेऊन त्यात हळद टाकून मिक्स करा. नंतर त्यात कोरफडचा गर घालून मिक्स करून घ्या. तयार करून घेतलेले मिश्रण संपूर्ण त्वचेवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर फेसपॅक पूर्ण सुकल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही. याशिवाय त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहील.

चेहऱ्यासह ‘या’ अवयवांना स्क्रबिंग करणे आवश्यक! अन्यथा तारुण्यात येईल म्हातारपण, त्वचा होईल निस्तेज

कॉफी फेसपॅक:

कॉफी फेसपॅक तयार करण्यासाठी सर्वप्रथम वाटीमध्ये कॉफी पावडर घेऊन त्यात ओट्सची तयार केलेली पावडर टाकून मिक्स करा. नंतर त्यात थोडेसे दही घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर फ्रिजमध्ये ५ मिनिटं ठेवून नंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. त्वचा अधिक सुंदर आणि टवटवीत दिसेल. हा स्क्रब त्वचेवर लावल्यानंतर हलक्या हाताने मसाज करून घ्या. नंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन कमी होईल.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Homemade face pack for dry skin home remedies for glowing skin how to make haldi facepack at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • Skin Care

संबंधित बातम्या

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा
1

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा

Skin Care Tips: स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
2

Skin Care Tips: स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

आंबट ढेकर आणि पित्ताच्या त्रासाने हैराण झाला आहात? Acidity च्या वाढत्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
3

आंबट ढेकर आणि पित्ताच्या त्रासाने हैराण झाला आहात? Acidity च्या वाढत्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ
4

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.