डार्क स्पॉटमुळे खराब झालेला चेहरा उजळ्वण्यासाठी लिंबाच्या रसात मिक्स करा 'हे' प्रभावी पदार्थ
त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. मात्र चेहऱ्यावर आलेले काळे डाग त्वचा निस्तेज करून टाकतात. पोट स्वच्छ न झाल्यामुळे किंवा शरीरात होणाऱ्या हार्मोन्सच्या असंतुलनामुळे चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येऊ लागतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स नखांनी फोडल्यानंतर त्वचेवर काळे डाग तसेच राहतात. त्यामुळे त्वचेवर आलेले डाग कधीच फोडू नये. त्वचेवर आलेल्या डागांमुळे त्वचेचे सौंदर्य कमी होऊन जाते. डार्क स्पॉट आल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम, फेशिअल इत्यादी अनेक गोष्टी करून घेतात. मात्र तरीसुद्धा त्वचेमध्ये कोणताच बदल दिसून येत नाही. त्वचेला बाहेरून पोषण देण्यापेक्षा आतून पोषण देणे जास्त गरजेचे आहे.(फोटो सौजन्य – iStock)
चेहऱ्यावर आलेले डार्क स्पॉट घालवण्यासाठी केमिकल उपाय करण्याऐवजी घरगुती उपाय करू शकता. लिंबाचा वापर करून त्वचेवरील डार्क स्पॉट कमी होतील. लिंबामध्ये असलेले गुणधर्म त्वचा उजळ्वण्यासाठी मदत करतात. यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता आणि पोत सुधारते. लिंबाच्या रसामध्ये विटामिन सी आणि सायट्रिक अॅसिड भरपूर प्रमाणात आढळून येते. सायट्रिक अॅसिड आणि विटामिन सी मुळे चेहऱ्यावर आलेले डार्क स्पॉट कमी होतात आणि त्वचा अतिशय सुंदर दिसते. आज आम्ही तुम्हाला डार्क स्पॉट घालवण्यासाठी लिंबाच्या रसात कोणते पदार्थ मिक्स करून लावावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
चेहऱ्यावर आलेले डार्क स्पॉट घालवण्यासाठी लिंबाचा रस आणि दह्याचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यात दही टाका. सर्व साहित्य मिक्स करून संपूर्ण त्वचेवर लावून ठेवा. 15 मिनिटं ठेवल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या त्वचेवर आलेले डाग कमी होतील आणि त्वचा स्वच्छ दिसेल. दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड आढळून येते, तर लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड आढळून येते. हा उपाय नियमित केल्यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग कायमचे निघून जातील.
मधाचा वापर त्वचेवर आलेले डाग घालवण्यासाठी आणि इतर अनेक कारणासाठी केला जातो. मधामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा उजळदार होते. त्वचेवरील डाग कायमचे निघून जातात आणि त्वचा स्वच्छ आणि सुंदर दिसू लागते. यासाठी वाटीमध्ये लिंबाचा रस आणि मध घेऊन मिक्स करा. मिक्स करून झाल्यानंतर तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून 15 मिनिटं तसेच ठेवा. 15 मिनिटांनी पाण्याने त्वचा स्वच्छ धुवा. हा उपाय नियमित केल्यास काही दिवसांमध्येच फरक दिसून येईल.
चेहऱ्यासह ‘या’ अवयवांना स्क्रबिंग करणे आवश्यक! अन्यथा तारुण्यात येईल म्हातारपण, त्वचा होईल निस्तेज
मागील अनेक वर्षांपासून त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफडचा वापर केला जात आहे. कोरफडचा वापर केल्यामुळे त्वचा अधिक हायड्रेट आणि फ्रेश दिसते. वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून 10 मिनिटं ठेवून द्या. त्वचा कोरडी झाल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय नियमित केल्यास त्वचेवरील डाग कमी होतील