ध्यान करताना मन भटकू नये म्हणून फॉलो करा 'या' टिप्स
वातावरणातील बदलांचे परिणाम आपल्या आरोग्यावर लगेच दिसून येतात. सतत बदल चाललेले वातारण, अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी इत्यादींचा परिणाम आपल्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे योग्य तो आहार घेऊन निरोगी जीवनशैली जगणे महत्वाचे आहे. कामाच्या किंवा इतर गोष्टींच्या तणावामुळे मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते.बिघडलेले मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आपण अनेक उपाय करतो.पण अशांत मनाला शांत करण्यासाठी ध्यान केल्यास मानसिक तणाव कमी होईल. ध्यान केल्याने मानसिक आरोग्य सुधारते. पण अनेकदा ध्यान करायला बसल्यानंतर नीट लक्ष लागत नाही. ध्यान करताना त्रास होतो इत्यादी अनेक समस्या जाणवतात. या समस्या जाणवू नये म्हणून कोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य-istock)
ध्यान करताना मन भटकू नये म्हणून फॉलो करा ‘या’ टिप्स
ध्यान करताना शरीर आणि मन आरामदायी असणे फार गरजेचे आहे. मनामध्ये असंख्य विचार चालू असतात तेव्हा ध्यान करताना लक्ष लागत नाही. शरीरातील वाढलेले अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी आणि अशांत मनाला शांत करण्यासाठी ध्यान करणे आवश्यक आहे. असे केल्याने तुमचे मन इकडे तिकडे भटकणार नाही.
हे देखील वाचा: तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळण्यासाठी जेवल्यानंतर खा ‘हा’ पदार्थ, आरोग्यासंबंधित समस्या होतील दूर
ज्या ठिकाणी तुम्ही ध्यान करण्यास बसत असाल अशा ठिकाणी स्वच्छता असणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी असलेले वातावरणच जर प्रसन्न नसेल तर ध्यान करताना तुमचे लक्ष लागणार नाही. त्यामुळे ध्यान करण्यासाठी निवडलेली जागा स्वच्छ असणे गरजेचे आहे.
ध्यान करण्याच्या अर्धा तास आधी कमी आवाजात शांत सूर असलेली गाणी ऐकावी. त्यानंतर ध्यान करण्यास बसावे. संगीत ऐकल्यामुळे तुमचे मन शांत आणि एकाग्र होते. त्यामुळे मन शांत करण्यासाठी तुम्ही संगीताची मदत घेऊ शकता.
हे देखील वाचा: मुरुमांचे डाग घालवण्यासाठी चेहऱ्यावर लावा खोबऱ्याचे तेल, रातोरात दिसेल चेहऱ्यावर चमक
नियमित ध्यान करताना वेळ निश्चित करून ठेवा. सकाळी उठल्यानंतर 6 वाजता नियमित ध्यान करत असाल तर दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळी उठल्यावर 6 वाजताच ध्यान करावे. असे केल्याने मन शांत राहते.ध्यान केलेल्या दिवसभर आळस किंवा कंटाळा येत नाही.
ध्यान करताना मन भटकू नये म्हणून फॉलो करा ‘या’ टिप्स
ध्यान करायला बसण्यापूर्वी शांत मन ठेवू ध्यान करावे. असे केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. रात्रीच्या वेळी चुकूनही ध्यान करण्यास बसू नये. दैनंदिन जीवनात रोजच्या रोज ध्यान केल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्याला फायदे होतात, अन्यथा शरीरावर कोणताही परिणाम दिसून येत नाही.