चेहऱ्याला खोबरेल तेल लावल्याने होणारे फायदे
पूर्वीच्या काळापासून खोबरेल तेलाचा वापर त्वचेसाठी केला जात आहे. खोबऱ्याचे तेल जेवण बनवण्यासाठी सुद्धा वापरले जाते. खोबऱ्याच्या तेलामध्ये असलेल्या गुणधर्मांनी केसांची वाढ होण्यास मदत होते. दक्षिण भारतीय लोक खोबरेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. विविध खाद्यपदार्थ बनवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर केला जातो. खोबऱ्याच्या तेलात तयार केलेले पदार्थ चवीला आणि आरोग्यसाठी सुद्धा फायदेशीर आहे. खोबऱ्याच्या तेलामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचा मऊ आणि चमकदार करण्यासाठी मदत करतात. या तेलाचा वापर करून चेहऱ्यावर चमक येते.
त्वचा आणि केसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेकदा आपण बाजारात मिळणारे महागडे प्रॉडक्ट किंवा किंवा कोणत्याही क्रीम्स लावतो. या क्रीम्स लावल्याने चेहरा अजूनच खराब होऊन जातो. त्यामुळे त्वचेवर कोणतेही क्रीम्स लावताना डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. केमिकल उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा घरगुती पदार्थ वापरावे, जेणेकरून त्वचेवरील समस्या दूर होण्यास मदत होईल. 1 चमचा खोबरेल तेलामध्ये 12 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट्स आणि १ ग्रॅम अनसॅच्युरेटेड फॅट्स आढळून येतात. आज आम्ही तुम्हाला खोबऱ्याचे तेल त्वचेला लावल्याने नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)
चेहऱ्याला खोबरेल तेल लावल्याने होणारे फायदे
चेहऱ्यावर खोबरेल तेल लावण्याआधी चेहरा स्वच्छ करून घ्या. त्यानंतर चेहरा कोरड्या कपड्याने पुसून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावर दोन ते तीन थेंब खोबऱ्याचे तेल टाकून हाताने सगळीकडे लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. जास्त वेळ चेहऱ्यावर मसाज करू नये.रात्रभर त्वचेवर तेल ठेवल्यानंतर सकाळी उठल्यावर चेहरा स्वच्छ करून घ्या. यामुळे तुमची त्वचा डाग विरहित होईल. तसेच त्वचेवर मुरुमांचे डाग निघून जातील.
हे देखील वाचा: World Brain Day 2024: जागतिक मेंदू दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि यंदाची थीम