आपल्या भारतात उत्तरेपासून दक्षिणेकडे सर्वाधिक आवडणारा पदार्थ म्हणजे भात. भाताशिवाय जेवण पूर्ण झालंय असं अनेकांना वाटत नाही. काही लोकांना वाटतं भातामुळे शरीराला हानी होते तर काही जणांना वाटतं भातामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.
खरं तर आयुर्वेदानुसार तुम्ही योग्य पद्धतीने तांदूळ शिजवल्यास भात हानिकारक ठरत नाही. आयुर्वेदात याची योग्य पद्धत सांगण्यात आली आहे आणि आम्हीदेखील तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी या लेखातून भात शिजविण्याची योग्य पद्धत सांगत आहोत. (फोटो सौजन्य – iStock)
[read_also content=”तासनतास सोलताय लसूण, वापरा सोपी ट्रिक https://www.navarashtra.com/lifestyle/peeling-garlic-wont-take-much-time-anymore-learn-this-simple-trick-535733.html”]
भातामधील पोषक तत्व
कार्बोहायड्रेटयुक्त, ग्लुटेन फ्री, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि विटामिन्सने युक्त असणाऱ्या भाताने शरीराला उत्तम एनर्जी मिळते आणि याशिवाय शरीराला आवश्यक असणारे पोषक तत्वही यातून मिळतात. तसंच भातामध्ये असणारे फायबर हे अन्नपचनक्रियेसाठी अधिक फायदेशीर ठरते. आम्ही या लेखात सांगत असणाऱ्या पद्धतीचा वापर केल्यास, तुम्हाला पोषण आणि स्वाद या दोन्हीमध्ये फायदा मिळू शकतो.

[read_also content=”नाचणीचे पौष्टिक आप्पे, जाणून घ्या रेसिपी https://www.navarashtra.com/lifestyle/you-may-have-eaten-appe-but-have-you-ever-eaten-nutritious-appe-note-the-recipe-535316.html”]
तांदूळ भाजून घ्या
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे तांदूळ धुऊन तसाच त्याचा भात केला जातो. मात्र आयुर्वेदानुसार, सुके तांदूळ भात करण्याआधी भाजून घ्यायला हवेत. भाजून घेण्याचं कारण म्हणजे तांदळावरील स्टार्च विविध पद्धतीने काम करते आणि तांदूळ कॅरामलाईज्ड होऊन त्याचा एक वेगळा स्वाद निर्माण होतो. भाजल्यामुळे तांदळातील स्टार्च कमी होतो आणि भात चिकट होत नाही.
या पदार्थांचा करा वापर
भात शिजवताना त्यामध्ये काही ठराविक पदार्थांचा वापर केल्यास अधिक चविष्ट होण्यास आणि पोषण मिळण्यास मदत मिळते. आयुर्वेदानुसार, तांदूळ धुतल्यानंतर त्यात पाणी, १ चमचा तूप आणि थोडेसे मीठ घालावे. कुकरमध्ये भात शिजविण्यापेक्षा बाहेर एखाद्या पातेल्यात भात उकडवणे अधिक फायदेशीर ठरते. आयुर्वेदानुसार अधिक फायदा मिळण्यासाठी यामध्ये तुम्ही गाईचे तूप वापरल्यास अधिक चांगले ठरते.






