Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंध्रप्रदेशात प्रत्येक घरी ‘या’ पद्धतीने बनवली जाते कच्च्या कैरीची आंबटगोड पारंपरिक चटणी, उन्हाळ्यात वाढेल जेवणाची चव

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये आंध्रप्रदेश स्टाईलने कच्च्या कैरीची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली कैरी चटणी भाकरी किंवा भातासोबत चांगली लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 20, 2026 | 02:50 PM
आंध्रप्रदेशात प्रत्येक घरी 'या' पद्धतीने बनवली जाते कच्च्या कैरीची आंबटगोड पारंपरिक चटणी

आंध्रप्रदेशात प्रत्येक घरी 'या' पद्धतीने बनवली जाते कच्च्या कैरीची आंबटगोड पारंपरिक चटणी

Follow Us
Follow Us:

आंबटगोड चवीच्या ताज्या कैऱ्यांपासून विविध पदार्थ बनवले जातात. उन्हाळ्यात शरीरात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी कैरीचे पन्ह, मुरंबा, कैरीचे सरबत इत्यादी पदार्थ अतिशय आवडीने बनवले जातात. जेवणाची चव वाढवण्यासाठी चिप्स, पापड किंवा इतर विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. पण नेहमीच तेलकट पदार्थ खाण्याऐवजी कैरीपासून बनवलेले पदार्थ खावेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आंध्रप्रदेशातील प्रत्येक घरात बनवल्या जाणाऱ्या कैरीच्या चटणीची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली चटणी लहान मुलांसह मोठेसुद्धा अतिशय आवडीने खातील. गरमागरम भात किंवा तांदळाच्या भाकरीसोबत कैरीची चटणी अतिशय सुंदर लागते. भाजी बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये कैरीची चटणी बनवू शकता. हा पदार्थ जेवणात तोंडी लावण्यासाठी खाल्ला जातो. दक्षिण भारतात कैरीपासून विविध पदार्थ बनवले जातात. चला तर जाणून घेऊया आंध्रा स्टाईल कैरीची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

कडक उन्हाळ्यात पाहुण्यांच्या स्वागतासाठी बनवा गोकर्णच्या फुलांपासून रेस्टॉरंट स्टाईल Blue Lagoon Mocktail

साहित्य:

  • कैरी
  • उडीद डाळ
  • डाळवं
  • लसूण
  • मेथी दाणे
  • लाल मिरच्या
  • कडीपत्ता
  • तेल
  • मीठ
  • लाल तिखट
कडक उन्हात पोटाला मिळेल तात्काळ थंडावा! ५ मिनिटांमध्ये तयार करा ताजे पुदिन्याचे थंडगार सरबत, राहाल कायमच फ्रेश

कृती:

  • आंध्रा स्टाईल कैरीची चटणी बनवण्यासाठी, कैरी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कैरीची साल काढून बारीक तुकडे करा.
  • गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा. तेल घालून लाल मिरच्या, लसूण पाकळ्या, उडीद डाळ, डाळवं आणि मेथी दाणे मंद आचेवर भाजा.
  • भाजलेले सर्व पदार्थ थंड करण्यासाठी ठेवा. मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले पदार्थ घेऊन बारीक वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात कैरीच्या बारीक केलेल्या फोडी घालून पुन्हा एकदा बारीक वाटून घ्या. तयार केलेली चटणी वाटीमध्ये काढून घ्या.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता, लाल मिरच्या घालून फोडणी भाजा आणि तयार केलेल्या चटणीवर ओतून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आंध्रा स्टाईल कैरीची चटणी.

Web Title: How to make andhra pradesh style raw mango chutney at home simple food recipe summer recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • easy food recipes
  • raw mango
  • Summer Food

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
1

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
2

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी
3

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक
4

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.