कडक उन्हात पोटाला मिळेल तात्काळ थंडावा! ५ मिनिटांमध्ये तयार करा ताजे पुदिन्याचे थंडगार सरबत, राहाल कायमच फ्रेश
राज्यासह संपूर्ण देशभरात उष्णतेची लाट आली आहे. कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर खूप जास्त थकल्यासारखे वाटते. तर काहीवेळा आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडते. पचनक्रिया बिघडल्यानंतर पोटात जळजळ, ऍसिडिटी, अपचन, उलट्या, मळमळ इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर अतिप्रमाणात उष्ण असलेल्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर फ्रिजमधील थंड पाणी प्यायले जाते. यामुळे केवळ तहान भागते पण शरीराला फारसा फायदा होत नाही. शरीरातील अंतर्गत उष्णता वाढल्यानंतर खूप जास्त घाम येणे, उष्णता वाढून लघवीसंबंधित समस्या उद्भवणे इत्यादी गोष्टींचा त्रास वाढतो. त्यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हला सोप्या पद्धतीमध्ये थंडगार पुदिन्याच्या पानांचे सरबत बनवण्याची कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले सरबत उन्हाळ्यासाठी उत्तम आहे. पुदिन्याची पाने नियमित चावून खाल्ल्यास पोटात थंडावा राहील. चला तर जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – pinterest)






