
लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक केळीचे पॅनकेक, नोट करून घ्या रेसिपी
सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं खूप जास्त घाई असते. घाईच्या वेळी लहान मुलांच्या डब्यासाठी नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. लहान मुलांना कायमच चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. पिझ्झा, बर्गर इत्यादी पदार्थ पाहिल्यानंतर मुलं हट्ट करतात. पण नेहमीच मुलांना विकतचे पदार्थ खाण्यास हवे असतात. तिखट आणि तेलकट पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये केळीचे पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. केळी खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते आणि आरोग्य सुद्धा चांगले राहते. पॅनकेक बनवण्यासाठी शक्यतो जास्त पिकलेल्या केळीचा वापर करावा. यामुळे साहित्य व्यवस्थित मिक्स होते आणि चव सुद्धा चांगली लागते. लहान मुलांच्या डब्यात खायला दिलेल्या पदार्थांचा त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. त्यामुळे मुलांना नेहमीच पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ खाण्यास द्यावे. चला तर जाणून घेऊया केळी पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)
Recipe : खास प्रसंगी मेजवानी करा चवदार, घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल कुरकुरीत आणि सॉसी ‘पनीर क्रिस्पी’