Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कायमच मसालेभात खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये बनवा चमचमीत हरियाली राईस, पौष्टिक चवीचा हेल्दी पदार्थ

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हरियाली राईस बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 30, 2026 | 01:50 PM
कायमच मसालेभात खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये बनवा चमचमीत हरियाली राईस, पौष्टिक चवीचा हेल्दी पदार्थ

कायमच मसालेभात खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये बनवा चमचमीत हरियाली राईस, पौष्टिक चवीचा हेल्दी पदार्थ

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय जेवणाच्या ताटातील मुख्य पदार्थ म्हणजे भात. जेवणात जर भात नसेल तर जेवल्यासारखे अजिबात वाटत नाही. कितीही चविष्ट आणि चमचमीत पदार्थ खाल्ले तरीसुद्धा भात ताटात कायमच हवा असतो. पण नेहमीच भात डाळ किंवा मसालेभात खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. प्रत्येकाला जेवणात काहींना काही नवीन पदार्थ हवे असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये तयार होणारा हरियाली राईस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला हरियाली राईस लहान मुलांच्या डब्यापासून ते अगदी घरी पाहुणे जेवायला आल्यानंतर सुद्धा तुम्ही बनवू शकता. हा राईस बनवताना तुम्ही त्यात वेगवेगळ्या भाज्या आणि कडधान्याचा सुद्धा वापर करू शकता. यामुळे चव चांगली लागते आणि लहान मुलं भाज्यांचे सेवन करतात. लहान मुलांना कायमच नवनवीन पदार्थ खाण्यास हवे असतात. कारण नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही वेगळी चव चाखण्याची सगळ्यांचं इच्छा होते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Summer Drink: उन्हाळ्यात शरीरात वाढलेला थकवा क्षणात होईल दूर! १० मिनिटांमध्ये बनवा चटपटीत कोकम मॉकटेल

साहित्य:

  • तांदूळ
  • मिक्स भाज्या
  • लाल तिखट
  • खडे मसाले
  • आलं लसूण मिरची पेस्ट
  • कोथिंबीर
  • कांदा
  • टोमॅटो
  • कढीपत्ता
  • मीठ
  • तूप
  • पुदिना
मासे प्रेमींसाठी खास! तंदुरशिवाय घरी बनवा स्मोकी आणि मसालेदार ‘तंदूर प्रॉन्स’, चव जी नेहमीच लक्षात राहिल…

कृती:

  • हरियाली राईस बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात तांदूळ घेऊन पाण्याने स्वच्छ धुवा आणि काहीवेळ पाण्यात भिजण्यासाठी ठेवा.
  • मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरच्या आणि पुदिन्याची पाने घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • कुकरमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. तूप गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, जिरं आणि खडे मसाले घालून भाजा. त्यानंतर त्यात कांदा आणि टोमॅटो घालून शिजण्यासाठी ठेवा.
  • कांदा लवकर शिजण्यासाठी त्यात चवीनुसार मीठ घाला. त्यानंतर त्यात तयार केलेला हिरवा मसाला घालून खमंग भाजा. मसाला भाजून झाल्यानंतर त्यात थोडीशी हळद आणि पुलाव मसाला घालून मिक्स करा.
  • सर्व मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर कापून घेतलेल्या भाज्या आणि भिजवलेला तांदूळ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तांदळाच्या अंदाजाने कुकरमध्ये पाणी घालून कुकरच्या ४ शिट्ट्या काढून घ्या. झाकण खोल्यानंतर त्यावर कोथिंबीर घाला.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला चविष्ट हेल्दी हरियाली राईस.

Web Title: How to make hariyali rice at home simple food recipe green rice recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Summer Drink: उन्हाळ्यात शरीरात वाढलेला थकवा क्षणात होईल दूर! १० मिनिटांमध्ये बनवा चटपटीत कोकम मॉकटेल
1

Summer Drink: उन्हाळ्यात शरीरात वाढलेला थकवा क्षणात होईल दूर! १० मिनिटांमध्ये बनवा चटपटीत कोकम मॉकटेल

मासे प्रेमींसाठी खास! तंदुरशिवाय घरी बनवा स्मोकी आणि मसालेदार ‘तंदूर प्रॉन्स’, चव जी नेहमीच लक्षात राहिल…
2

मासे प्रेमींसाठी खास! तंदुरशिवाय घरी बनवा स्मोकी आणि मसालेदार ‘तंदूर प्रॉन्स’, चव जी नेहमीच लक्षात राहिल…

Summer Drink: कडाक्याच्या उन्हाळ्यात मूड होईल फ्रेश! थकलेल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा कलिंगड सरबत
3

Summer Drink: कडाक्याच्या उन्हाळ्यात मूड होईल फ्रेश! थकलेल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा कलिंगड सरबत

Food Recipe: मॅगी खाण्याची नवीन पद्धत! संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये बनवा कुरकुरीत स्प्रिंग रोल्स, नोट करून घ्या रेसिपी
4

Food Recipe: मॅगी खाण्याची नवीन पद्धत! संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये बनवा कुरकुरीत स्प्रिंग रोल्स, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.