
नारळीपोर्णिमेनिमित्त बनवा महिनाभर व्यवस्थित टिकून राहणाऱ्या ओल्या खोबऱ्याच्या चविष्ट करंज्या
संपूर्ण राज्यभरात सगळीकडे नारळी पौर्णिमेचा मोठा उत्साह आहे. श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सणाला धार्मिक महत्व आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी करून सोन्याचा नारळ अर्पण केला जातो. याशिवाय ओल्या खोबऱ्याचा वापर करून वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवले जातात. नारळी भात, खोबऱ्याच्या वड्या आणि खोबऱ्याच्या करंज्या अतिशय आवडीने बनवल्या जातात. बऱ्याचदा ओल्या खोबऱ्याच्या वड्या बनवल्यानंतर त्या लवकर खराब होऊन जातात. खोबऱ्यातील ओलसरपणा पूर्णपणे आटून गेल्यास पदार्थ खराब होत नाही. त्यामुळे सारण तयार करताना खोबऱ्याच्या किसातील पाणी पूर्णपणे आटवावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ओल्या खोबऱ्याच्या करंज्या बनवण्याची झटपट होणारी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील प्रत्येक व्यक्तीला खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)