डाळभाताची चव वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा मसालेदार अंड्याचे काप, लहान मुलांचा आवडता पदार्थ
भारतीय जेवणात डाळभात हा अतिशय प्रसिद्ध पदार्थ आहे. डाळभाताशिवाय जेवणाला चांगली चव लागत नाही. हा पदार्थ चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे. पण बऱ्याचदा दुपारच्या जेवणात डाळभात बनवल्यानंतर तोंडी लावण्यासाठी काय बनवावे? सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मसालेदार अंड्याचे काप बनवू शकता. अंडी आरोग्यासाठी पौष्टिक असतात. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा अंड्याचे सेवन करावे. अंड्यांपासून विविध पदार्थ बनवले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही चमचमीत आणि मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास मसालेदार अंड्याचे काप बनवावे. अंड्याचे काप डाळभातासोबतच नाहीतर चपाती किंवा गरमागरम भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. हा पदार्थ लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा उत्तम आहे. चला तर जाणून घेऊया मसालेदार अंड्याचे काप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






