हॉटेल स्टाईल चवदार सांबार'या' पद्धतीने घरीच बनवा
भारतासह जगभरात सगळीकडे साऊथ इंडियन पदार्थ सगळीकडे प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये इडली, डोसा, आप्पे, मसाला डोसा इत्यादी पदार्थ प्रामुख्याने बनवले जातात. लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा साऊथ इंडियन पदार्थ खायला खूप आवडतात. त्यातील सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे सांबर. इडली, डोसा हे पदार्थ खाताना सगळ्यांना सांबर खायला खूप आवडत. पण अनेकदा सांबर बनवताना ते हॉटेलसारखं होत नाही. सांबर बनवताना त्यात भाज्या अनेक भाज्या त्यात टाकल्या जातात. सांबर बनवताना त्यात तुरीची डाळ, उडीदाची डाळ, दुधी, शेवग्याच्या शेंगा, कांदा, टोमॅटो इत्यादी भाज्या टाकल्या जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हॉटेल स्टाईल सांबर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा