१० मिनिटांमध्ये घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कोजागरी स्पेशल दूध मसाला
नवरात्री उत्सवानंतर लगेच सगळीकडे कोजागिरी पौर्णिमा साजरा केली जाते. कोजागिरीच्या दिवशी सगळीकडे मसाला दूध बनवले जाते. याशिवाय अवकाशातील चांदण्यांच्या प्रकाशात गरमागरम दूध प्याले जाते. मसाला दूध चवीला अतिशय सुंदर लागते. केशर, सुका मेवा आणि मसाल्यातील इतर पदार्थांचा वापर सुगंधी मसाला तयार केला जातो. गोडसर गरम दुधामुळे शरीरात उबदारपणा वाढतो आणि शरीराला अनेक फायदे होतात. कोजागिरी पौर्णिमा हा केवळ सण नसून एकत्र कुटुंबात आनंद साजरा करण्याचा सुंदर दिवस आहे. कोजागरीच्या दिवशी सर्वच घरांमध्ये मसाला दूध बनवले जाते. दूध बनवण्यासाठी लागणारा चविष्ट मसाला बाजारातून विकत आणला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोजागिरी स्पेशल दूध मसाला बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा मसाला ५ मिनिटांमध्ये झटपट तयार होतो. जाणून घ्या दूध मसाला बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य: Pinterest)
चवीबरोबरच घ्या आरोग्याचीही काळजी… घरी बनवा स्वादिष्ट मसाला ओट्स; चव अशी की पदार्थाचे फॅनच व्हाल






