शरीरात वाढलेला थकवा- अशक्तपणा कमी करण्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा गूळ फुटण्याचे लाडू
वय वाढल्यानंतर महिलांसह पुरुषांना सुद्धा पोषण आहाराची आणि विश्रांतीची आवश्यकता असते. कारण या दिवसांमध्ये शरीरात अनेक बदल होतात. शरीरात कायमच थकवा, अशक्तपणा, हाडांमध्ये वेदना, मानसिक तणाव, मासिक पाळीच्या वेदना, हार्मोन्सचे असंतुलन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर शरीराला हानी पोहचते. त्यामुळे आहारात कायमच हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. गूळ, तूप आणि चणे खाण्याचा सल्ला कायमच दिला जातो. गूळ खाल्यामुळे शरीरात उष्णता वाढते आणि चणे खाल्यामुळे शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. मासिक पाळीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी गूळ आणि चणे खावेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये गूळ चण्यांचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे लाडू अतिशय कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये बनतात.(फोटो सौजन्य: Pinterest)