डब्यासाठी बनवा चमचमीत बटाट्याच्या काचऱ्या
सकाळच्या घाईगडबडीमध्ये रोज रोज डब्यात कोणती भाजी घेऊन जावी हे समजत नाही. अशावेळी अनेक लोक बाहेरून विकत आणलेली भाजी खातात. मात्र सतत बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खावेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डब्यात चमचमीत बटाट्याच्या काचऱ्या बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बटाटा हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडतो. बटाटे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. बटाटे खाल्यामुळे पोटही लवकर भरते. बटाट्यांमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. कमीत कमी वेळात जर भाजी बनवण्याची असेल तर सगळ्यात आधी बटाट्याचे नाव घेतले जाते. बटाटा 5 ते 10 मिनिटांमध्ये लगेच शिजतो आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही. चला तर जाणून घेऊया बटाट्याच्या काचऱ्या बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा