
उपवासाच्या दिवशी साबुदाणे, बटाटा खाऊन कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ग्लूटेन फ्री राजगिरा सुकडी
आषाढी एकादशीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यादिवशी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोठ्या आनंद आणि उत्साहात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विठ्ठलाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. याशिवाय उपवास सुद्धा केला जातो. उपवास केल्यानंतर कायमच साबुदाणे, बटाटा किंवा चिप्स खाल्ले जातात. पण उपाशी पोटी साबुदाणा खिचडी खाल्ल्यास ऍसिडिटी वाढून आरोग्य बिघडते. त्यामुळे उपवास केल्यानंतर कायमच साबुदाणा किंवा बटाटा खाऊ नये. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ग्लूटेन फ्री राजगिरा सुकडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि राजगिरी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. उपवास केल्यानंतर सहज पचन होणाऱ्या आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. यामुळे आरोग्य सुधारते आणि लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया ग्लूटेन फ्री राजगिरा सुकडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)